केंद्रात मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळाल्या नंतर राज्यात विधान सभेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला भाजप मात्र समान वाटापावरून शिवसेना-भाजप युती तुटली आणि राज्यात नव्या प्रयोग समोर आला.शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिनही राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून सरकार बनवलं या सरकारला सहा महिने पुर्ण झाली.
काॅग्रेस च्या मंत्र्यांना सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केल्या जात नसल्याने दुय्यम स्थान मिळत असल्याची ओरड काॅग्रेसचे नेते मंडळी उघडपणे करित आहे.मात्र सध्या राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना काॅग्रेस मंत्र्यांची नाराजी खरचं योग्य आहे का? त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काॅग्रेस वर नाराज असल्याचे देखील बोलल्या जात आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार मधून बाहेर पडण्यासाठी 'प्लान बी' चा शोध घेत असल्याची चर्चा आहे.
काॅग्रेसमुळे भाजपला आच्छे दिन येण्याची शक्यता?
महाविकास आघाडी सरकाराच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नाही,अशी नाराजी वारंवार बोलवून दाखवत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माहिती आहे. काॅग्रेसची नाराजी अशीच सुरू राहिल्यास शिवसेना केव्हा ही सरकार मधून बाहेर पडू शकते. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत आल्यास नवल वाटू नये.भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची विचारधारा शेवटी एकच आहे हे सुध्दा काॅग्रेसने विसरून चालणार नाही.भाजप सत्तेमुळे अहंकार आला होता.त्यामुळे भाजप नेत्यांना अंहकरातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेने दुसरा मार्ग निवडला परंतू काॅग्रेस अधून मधुन किट किट करित असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी काॅग्रेसच्या नाराजी बदल नाराजी व्यक्त केल्याने शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून मंगळवारी टिका करण्यात आल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.उद्धव ठाकरे हे मुरबी राजकारणी नाही,हे काॅग्रेस नेत्यांना समजायला हवं अशी भावना काॅग्रेस मधील दुसऱ्या गटातील नेत्यांची आहे.त्यामुळे काॅग्रेस चे बोटावर मोजण्याइतके नेत्यांनी मिळालेल्या संधीचे सोंन करून घेतल्यास येणाऱ्या काळात काॅग्रेसला चांगले दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response