Breaking

Post Top Ad

रविवार, १४ जून, २०२०

देशात कोरोनामुळे मृत्यूदरात कोणाचा प्रमाण जास्त आहे?

देशात कोरोनामुळे मृत्यूदरात कोणाचे प्रमाण जास्त आहे
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात या विषाणूची जोखीम पुरुषांना अधिक असल्याचे निष्कर्ष समोर येत होते.मात्र आता नव्या माहिती नुसार कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका हा महिलांमध्ये असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.

दि.२० मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मृत्युदराचे प्रमाण हे अधिक आहे. ग्लोबल हेल्थ सायन्स ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार,कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितीत पुरुषांचे मृत्यु प्रमाण हे २.९ टक्के इतके असून महिलांचा मृत्यू दर हा ३.३ टक्के एवढा आहे.
विविध देशाकडील प्राथमिक पुराव्यांवरून असे दिसून येते की,पुरुषांना संसर्ग तसेच मृत्यूचा जास्त धोका अधिक असतो.मात्र भारतात चित्र वेगळे दिसून येत आहे. पाच वर्षाखालील मुलांमध्ये ५१ टक्के, मुलींमध्ये ४८.५ टक्के, ३० ते ३९ या मध्यम वयोगटातील जवळपास ७०.४ टक्के, प्रमाण पुरूषांचे आहे.मृत्यूदरात वयोवृद्ध महिलांमधील आकडा हा सर्वाधिक आहे. ३० ते ४० वयोगटातील महिलांमध्ये २१.३ टक्के, इतका कमी मृत्युदराची नोंद झाल्याची माहिती आहे.
वेगवेगळ्या संस्थेचा डेटा एकत्रित करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.२० मे पर्यंत च्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये पुरुषांचा आकडा ६६ टक्के असून उर्वरित ३४ टक्के कोरोनाग्रस्तांमध्ये महिलांचा समावेश आहे.कोरोना विषाणूंची लागण होण्याच्या स्त्री-पुरुष प्रमाणात मोठे अंतर दिसत असले तरी मृत्युदर हा महिलांमध्ये अधिक असल्याचे दिसून आले आहे. यात पाच वर्षाखालील आणि वयोवृद्ध महिलांचा समावेश आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad