Breaking

Post Top Ad

शनिवार, २७ जून, २०२०

योगगुरु रामदेवबाबा सह चौघांविरोधात गुन्हा दाखल

योगगुरु रामदेवबाबा सह चौघांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र24मंगळवारी बाबा रामदेव यांनी कोर अनिल औषधाचे लाँचिंग केल. "कोरोना वर १००% लागू होणार औषध आणि सात दिवसात कोरोना रुग्ण बरा होईल," असा दावा योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीने केला होता. त्यानंतर या वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने या औषधाच्या चाचण्याचे सर्व रिपोर्टस मागवले तसेच कोरोना मधून मुक्ती देणारे औषध अशी जाहिरात बंद करण्याचेही आदेश दिले होते.

योगगुरु बाबा रामदेव यांच्या "पतंजली आयुर्वेद" ने बनवलेले करोनिल औषध वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने या औषधा वरून आता जयपुर मध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक  आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघां विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषधाच्या सेवनामुळे रुग्ण कोरोना वायरस मधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप दाखल केलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे.

"वैद्यकीय चाचणी पूर्वी करोनिलला कधीही कोरोना औषध म्हटलंच नाही"
शुक्रवारी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून "आम्ही वैद्यकीय चाचणी पूर्वी अनिल गोळ्यांना कधी वैद्यकीय रित्या आणि कायदेशीर रित्या कोरोना चे औषध म्हटलं नाही," असे आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे.
जयपूरच्या ज्योतीनगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएस चे चेअरमन बलबीर तोमर संचालक अनुराग तोमर यांच्या विरोधात औषधा वरून दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा रामदेव आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदविण्यात आल्याचा वृत्ताला ज्योती नगर पोलीस ठाण्याचे सुधीर कुमार उपाध्य यांनी दुजोरा दिला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad