अन्यथा लवकरच नाभिक समाज रस्त्यावर उतरून व्यवसाय करतील असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या आठ दिवसात यावर निर्णय घेण्यासंदर्भात मान्य केले. तसेच याप्रसंगी बाळापूरमधील करोनाग्रस्त भागातील आरोग्य तपासणी करिता वंचीततर्फे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचा मानस ॲड प्रकाश आंबेडकर व्यक्त केला. ज्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वागत केले.
Post Top Ad
शुक्रवार, १९ जून, २०२०
नाभिक समाजासाठी ॲड प्रकाश आंबेडकर यांचा पुढाकार !
सध्या लॉकडाउनच्या काळात अनेकांचे व्यवसाय व रोजगार बंद पडले आहे. नाभिक समाजाला त्याची सर्वात जास्त झळ पोहचत आहे. सध्या जवळपास सर्वच दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे परंतु केशकर्तनालय, ब्युटिपार्लर यांना मात्र परवानगी देण्यात आली नाही. यामुळे अकोला जिल्ह्यातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी नाभिक समाजाच्या प्रतिनिधी सोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेउन जिल्ह्यातील केशकर्तनालय ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी चर्चा केली.
यावेळी पिंप्री चिंचवड महानगरपालिकेने केशकर्तनालाय सुरू करण्याचा दिलेल्या परवानगीच्या धरतीवर अकोला जिल्ह्यातीलही सर्व केशकर्तनालय व ब्युटि पार्लर उघडण्याची परवानगी द्यावी असे सुचविले.
नाभिक समाज या लॉकडाउनमुळे विपन्नावस्थेत आला असून अकोट येथे उपासमारी व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या देखील झाली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सदर समस्येतून बाहेर पडण्यासाठी नाभिक समाजाला तात्काळ दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच तोपर्यंत नाभिक समाजातील लोकांना मोफत अन्नधान्य व आर्थिक मदत करावी अशी आग्रही भुमिका ॲड ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response