आपण सगळे एक आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींच्या सोबत आहोत. लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत असून भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या चीनला कायमचा धडा शिकवण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय व्हिडिओ कॉम्फ्रशेन बैठकीत केली.
Post Top Ad
शुक्रवार, १९ जून, २०२०
भारताला दुबळा समजणाऱ्या चीनला धडा शिकवा; उद्धव ठाकरे यांची मागणी
भारताला शांतता हवी असून शत्रू जर आमच्या कडे वाकड्या नजरेनी पाहत असेल तर मोदी सरकार त्याला उत्तर देण्यास सक्षम असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं. मात्र भारताला जर कोणी दुबळा समजत असेल तर शत्रूचे डोळे काढून त्यांच्या हातात देण्याची ताकत मोदी सरकार मध्ये आहे. देशाच्या प्रश्नावर आपण सगळे सोबत आहोत. सरकार आणि लष्कराचे जवान व त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या चीन ला धडा शिकवण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारने चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या या पार्श्वभूमीवर यापूर्वीच सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी होती, असं सोनिया गांधी यांनी म्हटले. त्याचबरोबर जवानांच्या बलिदानाचा सन्मान झाला पाहिजे. जवानांनी शास्त्र ठेवावेत की नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित केल्या जातं. यामुळे अशा संवेदनशील प्रकरणी कराराचे पालन करणे गरजेचे आहे हे असे असे मत शरद पवार यांनी बैठकीत बोलून दाखविले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response