|
शेख वसिमा च्या घरा समोर तिचे कौतुक करतांना |
शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे असे म्हटल्या जाते. जो ते शिक्षणाचा दुध प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही हा इतिहास आहेत. त्या दुधाची चव चाखण्यासाठी सदैव आलेल्या संकटाशी दोन हात करून नेहमी पुस्तकामध्ये डोळे खुपसुन राहणारी एका अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी नुकताच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगची परिक्षा उत्तीर्ण होऊन उप-जिल्हाधिकारी झाली आहेत.
शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा घामाचे आणि रक्ताचे मुल्यांकन जगातील कोणत्याच पारंगत अभियंत्याला करता येत नाही, मळलेल्या कपड्यात आजीवन कष्ट उपसणाऱ्या आई व भाऊंच्या कष्टाचे मुल्यांकन शेख वसिमा ने बालपणीच आपल्या काळजावर कोरून घेतले असावे. भावाची माया काय असते हे शेख वसिमा याचा मोठा भाऊ अर्थात रिक्षा चालक इमरान ने दाखवून दिले. वसिमा मोठ्या पदापर्यंत तू गेलीस ते केवळ आणि केवळ तुझ्या आई व भावामुळे त्यामुळे या दोघांना कधीही विसरून चालणार नाही.
जोशी-सांगवी.ता.लोहा जिल्हा नांदेड येथील आई बांगड्या विकून आणि मोठा भाऊ इमरान रिक्षा चालक यांनी शेख वसिमा हिला शिकविण्यासाठी तारेवरची कसरत करून तिला उप-जिल्हाधिकारी या पदापर्यंत पोहचविले. नुकताच उप-जिल्हाधिकारी झालेल्या शेख वसिमा हिची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहेत. घरात वडिल शेख महेबुब हे कितेक वर्षा पासून एका आजाराने ग्रस्त आहेत.त्यातच तिची आई घरोघरी जावून बांगड्या विकते तर मोठा भाऊ इमरान हा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. राहयाला घर सुध्दा बरोबर नाही, अशाही कठीण प्रस्थितीतून शेख वसिमा हिने १ ते ५ पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले तद्नंतर गावातील बाल ब्रह्मचारी वैराजी महाराज माध्यमिक विद्यालयात शिक्षण पुर्ण केले. शनिवारी लागलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगची परिक्षेत शेख वसिमा ही मुलींमधून राज्यात तिसरा क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाली.
शेख वसिमा हिच्या घराचाच दृश्य संघर्षाचा साक्ष देतोय. खर तर मुस्लिम समाजात मुलींसंर्भात शिक्षणा बाबत आजही जनजागृती नाही, अशाही कठीण प्रस्थितीत आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असलेल्या घरातील लेक जिद्द आणि चिकाटीने शिक्षण घेवून उप-जिल्हाधिकारी या पदापर्यंत मजल मारते हे सर्व समाजातील मुली समोर शेख वसिमा हिने वेगळा आदर्श ठेवला आहेत. शेख वसिमा हिचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मुस्लिम समाजातील नागरिकांनी मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची काळाची गरज आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response