Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २६ जून, २०२०

'युवा मंत्री देणार राज्यातील युवकांना रोजगार'  


युवा मंत्री देणार राज्यातील युवकांना रोजगार   Maharastra24.in | माणुस वयाने किंवा पदाने मोठा होत नाही, असे आपण अनेक वेळा वाचलंय मात्र माणुस मोठा होतो त्याच्या अनुभवाच्या जोरावर असाचं काही राज्य सरकार मधिल  युवा मंत्र्याने घेतलेल्या निर्णयाचा तरूणांमध्ये 'त्या' निर्णयाची मोठी चर्चा होत आहे.
राज्याचे पर्यटन मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शांत आणि संयमी चेहरा म्हणुन त्यांच्या कडे पाहीले जाते. मात्र ते सतत युवकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत असतात. अशा एक निर्णय त्यांनी घेतला असून कोरोनाच्या संकटात अनेक युवकांना घरी बसावे लागले आहेत. त्या अनुषंगाने कोकण किणाऱ्यांवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे नवा ड्रीम प्रोजेक्ट उभा करित असल्याने युवकांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहेत.

महाराष्ट्रात पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने गोव्याच्या धर्तीवर राज्यातील ८ सागरी किणाऱ्यावर बीच शॅक्स उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही योजना कोकणातील किणाऱ्यांवर ही आता गोव्याचे रंग पाहायला मिळणार आहेत.
कुटीसाठी ३० हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल. तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ती रक्कम परत केली जाईल. चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत. या चौपाटी कुटीस सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा वेळेत सुरु ठेवणार आहे.
राज्यात पर्यटन वाढविण्यासाठी समुद्रकिणाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्या संदर्भातील धोरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहेत. चौपटी कुटी तात्पुरती हंगामी स्वरूपाच्या राहणार आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याची माहिती आहे. 
कुटी मिळणाऱ्या व्यक्तीकरिता परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे नापरतावा मूल्य असेल. तसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार रुपये वार्षिक शुल्क राहणार आहेत.
कोकणातील रत्नागिरी जिल्हातील गुहागर, आरेवारे; सिंधुदुर्ग जिल्हातील कुणकेश्वर, तारकर्ली; रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगर आणि पालघर जिल्हातील केवळा आणि ८ किणाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व माहिती सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.या पर्यटन मध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने युवकांना रोजगाराची संधी सहज उपलब्ध होणार आहेत. बीच शॅक्सच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींना ८० टक्के जागा राखीव असणार आहे. या कुटींचे तीन वर्षाकरिता वाटप करण्यात येईल अशी माहिती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad