देशात कोरोना महामारी आजारामुळे सर्वच अभिनेते-अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना ही कायम चर्चेत असते. यावेळी मात्र अभिनेत्री चाहत खन्ना एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.
चाहत खन्ना कोण आहे?
चाहत खन्ना ही दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. शाखा लाका बूम बूम या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर हिरो, कुमकुम एक प्यारा सा बंधन, बडे अच्छे लगते है, कबूल है यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
कोरोना विषाणूंच्या वाढत्या फैलावासाठी चाहत खन्ना हिने चीन ला जबाबदार ठरवले आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा असं मत चाहत खन्ना यांनी व्यक्त केले आहे. नुकताच IANS ला दिलेल्या मुलाखतीत चाहत खन्ना हिने चीनबाबत संताप व्यक्त केला आहे. 'ती' मुलाखतीदरम्यान म्हणाली की, "कोरोनाविषाणू च्या पैलवान साठी चीन जबाबदार आहे चीनला धडा शिकवण्यासाठी आपण चिनी वस्तूवर बहिष्कार टाकायला हवा. जर १३० कोटी भारतीयांनी चिनी वस्तू ऐवजी भारतीय वस्तूंचा वापर केला तर चीनला मोठा आर्थिक फटका बसेल.चीन हा सीमा वादावरून आपली जमीन बळकावण्याचे प्रयत्न करत आहे. आपण त्यांना आपली ताकद दाखवायला हवी".भारतातील जागृत नागरिकांनी चिनी वस्तूवर बहिष्कार टाकल्यास चीन आपोआप गप्प बसेल असे मत चाहत खन्ना हिने दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. Sopya Bhashet
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response