सध्या काँग्रेसने आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलविले आहे.दुसरीकडे राज्यसभेच्या निवडणुकीत सहभागी होता येऊ नये म्हणून आमचे वरिष्ठ आमदार पुंजा वंश यांच्यावर खोटे गुन्हे नोंदविले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी केला आहे.
Post Top Ad
शनिवार, १३ जून, २०२०
गुजरात मध्ये काँग्रेसच्या आमदारांना धमक्या?
राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ भाजपकडून आमच्या आमदारांना राजीनाम्यासाठी धमक्या दिल्या जात असून आर्थिक प्रलोभन दाखविले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.भाजपच्या खोडसाळ प्रवृत्तीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.
दुसरीकडे गुजरात पोलीस काँग्रेस आमदारांवर खोटे गुन्हे नोंदवित असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी व्हिडिओ काॅन्फरसिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना म्हणाले की, गुजरात मध्ये येत्या १९ जून रोजी राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे.
तत्पूर्वीच भाजप सत्तेचा गैरवापर करून घोडेबाजार करीत आहे.राज्यसभेची तिसरी जागा पदरात पाडून घेण्यासाठी आमच्या आमदारांना उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत.हे संविधान व लोकशाही विरोधी कृत्य आहे,भाजपने राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया भ्रष्टाचारमय केली आहे.राजीनाम्यासाठी भीती दाखवून धमकावण्याचा चुकीचा हातखंडा भाजपने अंगीकारला आहे. पंजाब भाई वंश नामक आमदारावर राजीनाम्यासाठी दबाव टाकला जात आहे, असे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय बाब अशी की, गुजरात मध्ये काँग्रेसच्या आठ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यसभेची दुसरी जागा जिंकण्याचे काँग्रेसचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response