संजय राठोड,वनमंत्री |
लोणार सरोवर हे उल्कापाताने तयार झालेले असून जगातील ते वैशिष्टपुर्ण सरोवर आहे. यातील क्षाराचे प्रमाण जास्त आहे.सरोवरातील पाण्यात विशिष्ट प्रकाराच्या हॅलो बॅक्टेरीया व शेवाळाच्या संयोगातून अशा प्रकारचे गुलाबी रंगाचे पाणी होत असावे,असे काही तज्ज्ञांचे मत आहे.तर काही तज्ज्ञांनी डुनलेलीया अल्गी व हॅलो बॅक्ट्रेरीया या जीवाणुमुळे बेटा कॅरोटीन रंगद्रव्य निर्माण झाल्याने लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी होत असल्याचे मत व्यक्त केले.इराणमधील क्षारयुक्त सरोवरामध्ये अश्याप्रकारे रंगात बदल झाल्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर चौकशी करण्यात येत असून अन्य कुठल्याही कृत्रिम घटकामुळे पाण्याचा रंग बदललेला नाही, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.अकोला येथील वन्यजीव विभागाने लोणार सरोवराच्या पाण्याचे शास्त्रीय पध्दतीने नमुने घेण्यासाठी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयचे डॉ.मिलींद शिरभाते यांना लोणार येथे पाठविले होते. त्यांनी गुलाबी रंगाच्या पाण्याचे व मातीचे नमुने गोळा करून वनविभागाकडे सादर केले आहे. पाण्यातील रंगबदल तपासासाठी सदर नमुने खास दुतामार्फत नागपूर येथील नीरी संस्थेकडे तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response