Breaking

Post Top Ad

सोमवार, २९ जून, २०२०

नाना पाटेकर भावूक होते तेव्हा..

महाराष्ट्र24। बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या पाटण्यातील घरी जावून नाना पाटेकर यांनी भेट घेतली. दरम्यान नाना पाटेकर हे पाटण्यात सीआरपीएफ जवानांच्या प्रशिक्षण केंद्राला भेट देण्यासाठी गेले होते. तद्नंतर नाना पाटेकर यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी दि.१४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनतर सुशांत च्या आत्महत्या वरून विविध आरोप करण्यात आले. त्यामुळे पोलीस सुशांत च्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत निधनानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी सुशांतच्या कुटूंबीयांची भेट घेतली.

नाना पाटेकर यांनी पाटण्यातील सीआरपीएफ जवानांच्या प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन जवानांशी संवाद साधला. त्यानंतर नाना पाटेकर यांनी सुशांत सिंह राजपूत यांच्या पाटण्यातील घरी भेट देऊन कुटूंबीयाचे सात्वंन केले. यावेळी नाना पाटेकर सुशांत च्या कुटूंबीयांशी बोलतांना भावूक झाले होते. "सुशांतचं जाणं हा आमच्या सगळ्यांसाठी मोठा धक्का होता. तो अतिशय गुणी व उत्तम अभिनेता होता. सुशांतला नक्कीच न्याय मिळेल," अशा शब्दात नाना पाटेकर यांनी सुशांतचे वडिलांना धीर दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad