विधान परिषदेवरील राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारांच्या निवडी साठी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह आघाडीच्या नेत्यांची डोकेदुःखी वाढणार आहे.राजभवनाने काही त्रुटी काढू नये साठी नियमात बसणाऱ्या पात्र उमेदवारांची शिफारस करण्याकडे शिवसेना,काॅग्रेस आणि राष्ट्रवादी चा कल असणार आहे.
विधान परिषदेत ७८ सदस्यांच्या जेष्ठ सभागृहात सध्या १० जागा रिक्त आहे.दोन जागा येत्या १५ जुन रोजी त्यांची मुदत संपणार आहे.त्यामुळे एकुण १२ जागा ह्या कला,साहित्य,विज्ञान,समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रातील अनुभवी सदस्यांसाठी असतात.काही दिवसा आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन प्रस्ताव मान्य केले नाही,त्यामुळे मुख्यमंत्री सह आघाडीच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.
|
ख्वाजा बेग |
काॅग्रेस-राष्ट्रवादी इच्छुक
काॅग्रेस मध्ये प्रवक्ते सचिन सावंत आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे इच्छुक असून राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये रूपाली चाकणकर, राजन पाटील, सुषमा अंधारे, महेश तपासे, नजीब मुल्ला, ख्वाजा बेग यांच्या नावाची चर्चा आहे.
|
बाळासाहेब मुनगिनवार |
शिवसेनेमध्ये यासंदर्भात अद्यापही चर्चा सुरू नसली तरी यावेळी यवतमाळ जिल्हात पहिले आमदार राहिलेले आणि पक्षासोबत राहून कायम सामाजिक,सहकार आदी क्षेत्रात काम करून शिवसेना वाढवण्यासाठी आहो रात्र काम करणारे श्रीकांत ऊर्फ बाळासाहेब मुनगिनवार यांचे नाव आघाडीवर असून संपुर्ण आयुष्य पक्षासाठी खर्च करणाऱ्या मुनगिनवार यांना संधी देण्याची दाट शक्यता असल्याची माहिती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response