Breaking

Post Top Ad

मंगळवार, २३ जून, २०२०

शिवसेना भवन कोणी केले बंद

शिवसेना भवन कोणी केले बंद

करोडो शिवसैनिकांचे ऊर्जा स्थान, मंदिर म्हणुन ओळख असलेल्या आणि वाघाची डरकाळी फोडणाऱ्या शिवसेना पक्षाचे कार्यालय म्हणजे शिवसेना भवन मात्र या आधी या भवनला बंद करण्याची हिंमत कोणी दाखवली नाही,  आज मात्र कोरोना या महामारी आजारा मुळे शिवसेना भवन काही दिवसा साठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत.

शिवसेना भवन मधील एका जेष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्यांचे निष्पन्न झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दादर येथील शिवसेना भवन काही दिवसा साठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. शिवसेना भवन मध्ये दररोज शिवसैनिक तथा नेत्यांनी मोठी वर्दळ असते. मात्र एका जेष्ठ शिवसैनिकांला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने शिवसेना भवन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दादर जवळील शिवाजी पार्क जवळ असलेल्या शिवसेना पक्षाचे भवन कोरोना या आजारामुळे सील करण्यात आले आहेत.शिवसेना पक्षांचे मध्यवर्ती कार्यालय आहेत. शिवसेनेशी संलग्न असलेल्या विविध संघटनांची कार्यलय शिवसेना भवनाच्या इमारतीत आहेत. त्यामध्ये स्थानीय लोकधिकार समिती, भारतीय कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष आणि आदी संघटनांची कार्यलये शिवसेना भवन मध्ये आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad