Breaking

Post Top Ad

शनिवार, ६ जून, २०२०

लॉकडाऊन चे उल्लंघन केल्यास करावी लागेल शौचालयाची सफाई, 'या' देशाने केलाय हा नियम

public toilet

इंडोनेशियाने कोरोनाविरूद्धच्या लढ्यात लॉक डाऊनचे उल्लंघन व सावधगिरी न बाळगणाऱ्यांविरोधात  कठोर शिक्षेचा निर्णय घेतला आहे. सामाजिक अंतर न ठेवणा्यांना स्वच्छतागृहे स्वच्छ करावी लागतील तर इतर उल्लंघनांवर भारी दंड आकारला जाईल. जकार्तामध्ये, अनेकांना हि शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जे लोक मास्क घालत नाहीत त्यांना अडीच लाख रुपये दंड भरावा लागेल, तर विनाकारण बाहेर गोळा झाल्यास लोकांना सार्वजनिक ठिकाणी बांधलेली शौचालये स्वच्छ करावी लागतील. लॉकडाउनचे उल्लंघन करणार्‍या कंपन्यांना 50 दशलक्ष रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल

इतर देशांप्रमाणे इंडोनेशिया मध्ये सुद्धा कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे तेथे सरकारने कठोर धोरणाचा अवलंब करून शिस्त मोडणाऱ्या नागरिकांना कठोर शिक्षा करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad