Breaking

Post Top Ad

मंगळवार, २१ जुलै, २०२०

जिल्ह्यात १९ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात १९ जणांची कोरोनावर मात

१४ जण नव्याने पॉझेटिव्ह
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले १९ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आज  नव्याने १४ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या १४ जणांमध्ये नऊ पुरुष व पाच महिला आहे. यात पुसद शहरातील रहमत नगर येथील एक पुरुष, नेर शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील इस्लामपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील तारपुरा येथील एक पुरुष व दोन महिला आणि यवतमाळ येथील पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सोमवारपर्यंत १५६ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात १४ जणांची भर पडल्याने हा आकडा १७० वर पोहचला. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या १९ जणांना सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १५१ झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे ८१ तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले ७० जण आहेत. 

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ५९४ झाली आहे. यापैकी ४२३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २० मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ९६ जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 23 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत १०१०३ नमुने पाठविले असून यापैकी ९७४२ प्राप्त तर ३६० अप्राप्त आहेत. जिल्ह्यात ९१४८ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad