Breaking

Post Top Ad

बुधवार, १ जुलै, २०२०

मित्राला व्हाॅट्सअप वरून अनोखी श्रध्दांजली

मित्राला व्हाॅट्सअप वरून अनोखी श्रध्दांजली

व्हाॅट्सअप, फेसबूक सह आदी शोसल मिडीया म्हणजे करमणुकीचे साधणं असंच काही समज अनेकांचा आहे. मात्र याच शोसल मिडीयाच्या माध्यमातून सकारात्मक विचार मांडून गरजूंना मदत करता येत असल्याचे यवतमाळ मध्ये एका व्हाॅट्सअप ग्रपुने दाखवून दिले.

शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ या कॉलेजचा सन १९९५ ते २००० या बॅच चा पॉलिचा "गोळा गोतावळा" या नावाचा व्हाॅट्सअप ग्रुप नंदु उर्फ साहेबराव सुदामराव गुडधे यांनी १ में २०१५ साली तयार केला. या व्हाॅट्सअप ग्रुप मध्ये सिविल,इलेक्ट्रिकल,मेकॅनिकल,केमिकल या विविध शाखेचे एकूण १५० च्या वर सदस्य समूहात सहभागी करण्यात आले. काही दिवसापूर्वी याच ग्रुपमधील स्थापथ्य अभियंता आतिक खान यांचे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामुळे निधन झाले आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ग्रुपमधील संपूर्ण ग्रुपमध्ये शोककळा पसरली.

व्हाॅट्सअप  ग्रुपचा उपयोग नुसतेच मनोरंजनाकरिता न करता आपण त्या माध्यमातून समाजाचे काही देणे लागतो,सामाजिक जाणीव ठेऊन समाजपयोगी कार्य करू शकतो व इतरांनाही असे कार्य करण्यासाठी प्रेरित करू शकतो असे या गृपचे अड्मिन नंदु उर्फ साहेबराव सुदामराव गुडधे यांनी केलेल्या मदतीच्या माध्यमातून शोसल मिडीयावर चांगला आदर्श डोळ्यापुढे ठेवला आहे. खऱ्या अर्थाने एक छोटीसी मदत म्हणून हीच मित्राला श्रद्धांजली देऊन व्हाॅट्सअप ग्रुपचा उद्देश सफल झाला असे कळविले व संपूर्ण ग्रुपमधील सदस्यांचे आभार मानले.
गेलेला जीव तर पुन्हा येणार नाही, पण मित्रत्वाच्या नात्याने कुटुंबाला काही मदत करता येईल का अशी कल्पना काहींना सुचली. तद्नंतर ग्रुप अड्मिन ला काही करता येईल का अशी विचारणा केली असता अड्मिन ने लगेच होकार देऊन ग्रुपवर मेसेज टाकला आणि अवघ्या दोन ते तीन दिवसात ग्रुपमधील मित्रांनी अड्मिन च्या विनंतीला मान देत प्रचंड मोठा प्रतिसाद देवून एक लाख पाच हजार रूपये  एवढी रक्कम जमा करण्यात आली.

यामध्ये काही महिला भगिनींचा पण सहभाग होता त्यानंतर अड्मिन ने ग्रुपमध्ये जमा झालेली रक्कम संदर्भात  सविस्तर चर्चा केली व काही मित्रांनी आजाराने निधन झालेल्या आतिक खान यांच्या मुलाच्या व मुलीच्या नावाने दोन पन्नास पन्नास हजाराच्या फिक्स्ड(एफ. डी.) डिपॉसिट केल्या व बाकी उरलेली रक्कम पाच हजार रूपये त्यांच्या कुटुंबाला सुपूर्द केली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास नक्की शेअर करा आणि महाराष्ट्र24 पेज लाईक करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला तुमची माहिती या themaharashtra24@gmail.com ईमेल आयडीवर पाठवू शकता.
अथवा व्हाॅट्सअप क्रमांक  9764273121 या वर सुध्दा पाठवू शकता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad