Breaking

Post Top Ad

गुरुवार, १६ जुलै, २०२०

'तीन लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त'

'तीन लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त'
यवतमाळ जिल्हातील मारेगांव येथे दि.११ जुलैच्या रात्री साडे आठ वाजता दरम्यान एक लाख रूपयांच्या बदल्यात तीन लाख रूपये देण्याचे आमिष दाखवून लुटल्याची घटना घडली होती.त्यानंतर मारेगांव पोलीसांनी घटनेची बारकाईने तपास करून दि. १५ जुलै रोजी आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीसांनी दिली.

दरोडेखोरांच्या टोळीने एका व्यक्तीला एक लाख रुपयांच्या मोबदल्यात तीन लाख रुपये देण्याचे सांगून लुटले होते. फिर्यादीने मारेगाव पोलिस ठाण्यात याबाबत प्रकरण दाखल केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिल कुमार नायक ठाणेदार जगदीश मंडलवार व इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून तपास कार्य सुरू करण्यात आले. अखेर पोलिसांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. 
बनावट नोटा
भद्रावती तालुक्यातील महेंद्र ईश्वरलाल तिवारी यांना मारेगांव येथील राजु बुजाडे, अविनाश जांभुळकर, लिलाधर मुरस्कर, मारोती पवार आणि अरविंद चौघुले या पाच आरोपींनी संगनमत करून एक लाख रूपयांच्या बदल्यात तीन लाख रूपये देण्याचे आमिष दाखवले होते. 
दरम्यान फिर्यादीला मारेगांवात बोलावून नोटांची अदला बदल केली. त्यानंतर सदर नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधीताने व्यवहारात वापरलेल्या बनावट नोटा नाकारल्या, मात्र आरोपींनी बळजबरीने त्यांच्या जवळच्या एक लाख रूपयांच्या चलनी नोटा हिसकावून घटनास्थळा वरून पळ काढला. 
तद्नंतर पोलीसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक करून चौकशी केली असता आरोपींनी व्यवहारात पुर्ण बनावट नोटा वापरल्याचे कबुली दिली. पोलीसांनी दीडशे नकली नोटासह तीन मोटारसायकल, पाच मोबाईल संच, दोन काठ्या असा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करित आरोपींना अटक केली आहे. या मध्ये पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आले आहे. पोलीसांनी आरोपी कडून लुटलेल्या एक लाख रुपए पैकी सत्यांशी हजार नगद  चिल्ड्रन बँकेचे तीन लाख रुपयांच्या नकली नोटा आणि तीन मोटरसायकल मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad