Post Top Ad
शनिवार, ११ जुलै, २०२०
"दापोलीत ३६६ कुटुंबाना मदतीचे वाटप"
रत्नागिरी:- कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात दापोलीतील माळणी,रोवले, पाडले, ईळने, आतगाव या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या गावांना भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले होते तसेच त्यावेळी काही गावातील लोकांना मदत ही पुरवली होती.
निसर्ग या चक्रीवाळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले होते. अनेक घरे भुईसपाट झाली होती, घरातील सर्व जीवनावश्यक सामानांचे नुकसान तसेच वीज प्रवाह खंडित झाला होता. त्यामळे शेतकरी तसेच गावकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. शासकीय मदत पोहचत नसल्याने गावकरी हताश झाले होते.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली त्यानुसार
आज प्रा.अंजली आंबेडकर यांच्या उपस्थितीत ३६६ कुटुंबियांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आनंद जाधव, सुजात प्रकाश आंबेडकर, साहिल आनंदराज आंबेडकर, अमन आनंदराज आंबेडकर, रितिका भीमराव आंबेडकर, यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response