Breaking

Post Top Ad

शनिवार, १८ जुलै, २०२०

बकरी ईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन

बकरी ईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन

यवतमाळ : जिल्ह्यात कोव्हीड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

त्या अनुषंगाने सर्व समाजबांधवानी बकरी ईदची नमाज घरीच अदा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात सर्व धार्मिक कायक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मशीद किंवा इदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता समाजबांधवांनी आपल्या घरीच अदा करावी. 

या परिस्थितीत सध्या जनावरांचे बाजार बंद राहतील. त्यामुळे नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरून संपर्क करून जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामुळे या क्षोत्रात बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही.

बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये अथवा एकत्र गोळा होऊ नये, सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने मृत्युची संख्या 17 झाली आहे. तर 30 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझेटिव्ह आलेले 17 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad