Breaking

Post Top Ad

बुधवार, १५ जुलै, २०२०

यवतमाळ मध्ये बुधवारी कोरोनामुळे किती रूग्णांचा मृत्यू झाला?

यवतमाळ मध्ये बुधवारी कोरोनामुळे किती रूग्णांचा मृत्यू झाला?

यवतमाळ जिल्ह्यात आज (दि. १५) दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या १५ झाली आहे. तर २४ तासात जिल्ह्यात पुन्हा १२ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. यात आठ जण प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे तर चार जण ॲन्टीजन रॅपीड टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या आठ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

दिवसभरात दोघांचा मृत्यु ; १२ पॉझेटिव्ह रुग्णांची भर आठ जणांना सुट्टी
बुधवारी कोरोनामुळे मृत्यु झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळातील तिरुपती नगर येथील ४१ वर्षीय पुरुष आणि दिग्रस येथील विठ्ठल नगर रहिवासी ६१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या १२ जणांमध्ये सात पुरुष आणि पाच महिला आहेत. यात दारव्हा येथील एक पुरुष व दोन महिला, दिग्रस येथील दोन पुरुष व दोन महिला, यवतमाळ येथील दोन पुरुष व एक महिला, पुसद येथील एक पुरुष आणि कळंब ग्रामीण येथील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहे. 

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत १३९ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यातील दोघांचा मृत्यु झाल्याने ही संख्या १३७ झाली.  यात आज (दि.१५) रोजी १२ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा १४९ वर गेला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या आठ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १४१ वर आली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४८८ एवढी आहे. यापैकी ३३२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १५ मृत्युची नोंद आहे. 
सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १५० जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 33 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने ७३०४ नमुने पाठविले असून यापैकी ७२३१ प्राप्त तर ७३ अप्राप्त आहेत. जिल्ह्यात ६७४३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad