Breaking

Post Top Ad

बुधवार, २२ जुलै, २०२०

जिल्हात कोरोना रूग्ण आढळ्या नंतर किती तालुक्यात आहे लाॅकडाऊन

जिल्हात कोरोना रूग्ण  आढळ्या नंतर किती तालुक्यात आहे लाॅकडाऊन
जिल्ह्यात ५४ जण नव्याने पॉझिटीव्ह  ; १ मृत्यू

१७ जणांची कोरोनावर मात
यवतमाळ, :  जिल्ह्यात आज  नव्याने तब्बल ५४ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे तर यवतमाळ शहरातील इस्लामपूरा भागातील ४६ वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटीव्ह आलेले १७ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ५४ जणांमध्ये ३१ पुरुष व २३ महिला आहे. यात नेर शहरातील एक पुरुष, दिग्रस येथील तीन पुरूष व तीन महिला, पुसद येथील १३ पुरुष व नऊ महिला, कळंब येथील दोन पुरूष व दोन महिला, पांढरवकडा येथील ११ पुरूष व सहा महिला, यवतमाळ येथील एक महिला, तर दारव्हा येथील एक पुरूष व दोन महिलांचा महिलांचा समावेश आहे.

दिग्रस मध्ये संचार बंदी 
दिग्रस शहरात कोरोना रूगांची संख्या वाढत असल्याने शहरात दि. २२ ते २८ जुलै पर्यंत कडक संचार बंदी लागु करण्यात आल्याने शहरातील रस्ते सामसुम असल्याचे दिसून येत होते. जिल्हात कोरोना हाहाकार माजवत असताना दिग्रस शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्णं आढळून येत आहे. त्या अनुषंगाने संसर्ग टाळण्यासाठी २२ ते २८ जुलै पर्यंत कडक संचार बंदी लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुसद शहरात लाॅकडाऊन 
कोरोना सारख्या महामारी मुळे जग हैराण असताना पुसद शहरात देखील कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरात लाॅकडाऊन सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत १५१ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह  होते. यात ५४ जणांची भर पडल्याने हा आकडा २०५ वर पोहचला. मात्र ‘पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या १७ जणांना सुट्टी झाल्यामुळे व १ पॉझेटीव्ह रुगणाचा मृत्यू झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १८७ झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे ११७ तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटीव्ह  आलेले ७० जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 648 झाली आहे. यापैकी ४४० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण २१ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ७७ जण भरती आहे.

यवतमाळ शहर व पांढरकवडा शहरात २५ जुलैपासून संपूर्ण लाॅकडाऊन 

 जिल्ह्यात विशेषत: यवतमाळ शहर व पांढरकवडा शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरील दोन्ही शहरात २५ जुलै पासून समोरचे सात दिवस संपुर्ण लॉकाऊन करण्यात येणार आहे. यात दवाखाने व मेडिकल स्टोअर्स उघडे राहतील. २५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या लॉकडावूनमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज ६० नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत १०५५४ नमुने पाठविले असून यापैकी १००१७ प्राप्त तर ५३७ अप्राप्त आहेत. जिल्ह्यात ९३६९ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. यवतमाळ शहर व पांढरकवडा शहरात २५ जुलैपासून संपूर्ण लॉकडावून : जिल्ह्यात विशेषत: यवतमाळ शहर व पांढरवकडा शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरील दोन्ही शहरात २५ जुलै पासून समोरचे सात दिवस संपुर्ण लॉकडावून करण्यात येणार आहे. यात दवाखाने व मेडिकल स्टोअर्स उघडे राहतील. २५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या लॉकडावूनमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad