मुलगी जेव्हा आपल्या सासरी जाते तेव्हा तिच्या रूपाबरोबरच तिच्या गुणांकडेही सर्वांचे लक्ष असते. अशा वेळी मुलीने माहेरहून मिळेलेले चांगले संस्कार आणि चांगल्या शिकवणी बरोबरच इतरही गोष्टींची काळजी घेणे अंत्यतं गरजेचे असते. त्या अनुषंगाने "आम्ही तुम्हाला देतोय काही आयडिया".
कुणावरही ओरडून वैतागून बोलू नका. अभद्र वाणीचा वापर करू नका. मधुर वाणीचा वापर करून तूम्ही लवकरच सगळ्यांच्या लाडक्या आणि पुढच्या लोकांच्या मनात घर कराल.
शिष्ट व्यवहार
शिष्टता एक असा गुण आहे जो इतर अवगुणांना लपवतो. तुम्ही तुमच्या शिष्ट व्यवहाराने संगळ्यांची मने तुम्ही जिंकू शकता.
परिवारातील सगळ्यांना आपले मानून त्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हा. त्यामुळे तुम्ही सर्वांच्या मनावर अधिक्य राज कराल.
सासूला कामात जेवढी मदत करता येईल तेवढी करा. कुणीही न सांगता सांगायला न लावता बैठक सजवा. किचन स्वच्छ करा.
कुटुंबातील सदस्यांपैकी कुणाच्याही चांगल्या कामाची प्रशंसा करा. सासऱ्यांनी तुमच्यासाठी एखादी गोष्ट आणली तर त्याची स्तुती करा.
नवीन घर, नवीन माणसे नवीन रीतिरिवाज असल्यामुळे वागताना, बोलतांना गोंधळ होईन चूक होणे स्वाभाविक आहे. आपल्या चुकीवर पांघरून घालण्याऐवजी 'ती' कबूल करा.
सासरी जशा प्रथा असतील त्या पाळा. सुरूवातीला सगळ्या गोष्टींचा स्वीकार करा. सगळ्यांची मने जिंका व हळूहळू हवे तसे बदल घडवून आणा.
नणंद मोठी असेल अथवा लहान तिचा आदर करा. लहान असेल तर तिच्याशी प्रेणाने वागा. दीराशीही लहान भावा प्रमाणे व्यवहार करा.
जर तुम्ही संयुक्त परिवारात सून म्हणुन गेला असाल तर सगळ्यांशी संतुलित व्यवहार करा. स्वतःला चांगले सिद्ध करण्यासाठी एक मेकांबद्दल वाईट सांगू नये. पतीलाही घरच्या विरूद्ध भडकवू नये. सगळ्यांशी सामान्य व्यवहार करावा. सासरी माहेरचेच गुणगान करू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response