Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

कुंकू आणि बांगड्या हीच विवाहितेची ओळख आहे काय?

कुंकू आणि बांगड्या हीच विवाहितेची ओळख आहे  काय

'सबसे बडा खिलाडी' , 'नागिन', 'याद पिया की आने लगी' इत्यादी चित्रपटातील गाणी आठवण्याचे कारण म्हणजे आसाम मधील गोवाहाटी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घटस्फोटाच्या एका प्रकरणात दिलेल्या निकालात ' मांग मे सिंदुर '  आणि 'चुडियाँ'  म्हणजे बांगड्या यांचा संदर्भ आलेला आहे. नुसता संदर्भच नव्हे तर याच कारणावरून पतीने घटस्फोटासाठी केलेला अर्ज मंजूर केल्याचा अजब निकाल दिला आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या आजच्या काळात व महिला सशक्तीकरणासाठी असलेल्या प्रयत्नांच्या वातावरणात बाकी उच्च न्यायालयाचा हा निर्णय देशभर चर्चेत आला आहे .विषय असा आहे की ,आपली बायको  "मांग मे सिंदुर नही लगाती " आणि ती हातात बांगड्यादेखील घालत नाही. तिच्या अश्या वागण्याने हिंदू रीतीरिवाज  चा भंग होत असून तिचे असे वागणे हे हिंदु संस्कृतीच्या विरुद्ध आहे. 

'मांग  मे सिंदुर लगाना और चुडिया पहनना सौभाग्य का लक्षण है' असे सांगत पतीने आपल्या पत्नी विरुद्ध कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मांग मे सिंदूर  न लावणे ,बांगड्या  न भरणे यात कोणत्याही प्रकारे पतीच्या विरुद्ध क्रूरता सिद्ध होत नाही असा निर्वाळा देत कौटुंबिक न्यायालयाने पतीचा अर्ज फेटाळून लावला होता. कौटुंबिक न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध आव्हान देणारी याचिका पती महोदयांनी गुवाहाती उच्च न्यायालयात दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती अजय लांबा आणि न्यायमूर्ती सन्मित्र सैकिया यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द करीत पतीच्या घटस्फोटाचा अर्ज परवा मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाचे म्हणणे असे की विवाहितेने 'मांग मे सिंदुर' न भरणे आणि हातात बांगड्या न घालणे हिंदू रीतीरीवाजाच्या विरुद्ध असून त्यामुळे ती विवाहीत असल्याचे दिसत नाही,किंबहुना तसे वागणे याचा अर्थ या महिलेला हा विवाह मान्य नाही असा होतो. 

तेरे संग प्यारमई नहीं तोड़नामांग मेरी शबनमने मोती भरेऔर नजारो नेमेहंदी लगाईभरो मांग मेरी भरोचलो प्यार मुझे करोअंग से अंग लगाके प्रेम सुधा बरसादे भरो मांग मेरी भरोचलो प्यार मुझे करोचुडी जो खनके हाथो मे याद पिया की आने लगी
पतीसोबत दांपत्यजीवन जगायला ती तयार नाही असाही निष्कर्ष न्यायालयाने  काढला आहे .या दाम्पत्याचा विवाह १७ फेब्रुवारी २०१२ ला झाला होता .काही दिवसात दोघांमध्ये भांडणे व्हायला लागली. संबंधित महिला आपल्या पतीच्या कुटुंबातील सदस्यांच्या सोबत राहायला तयार नव्हती. परिणामतः ते दोघे ३० जून २०१३ पासून वेगवेगळे रहात आहेत. गुवाहाती उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे की या विवाहितेने आपल्या पती आणि त्याच्या कुटुंबियातील सदस्यांच्या विरुद्ध लावलेले छळाचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे .तिने केलेल्या यासंबंधीच्या तक्रारीत दम नाही. आपल्याकडेही महिलेच्या सौभाग्याचे चिन्ह किंवा लक्षण म्हणून कपाळी कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि हातामध्ये बांगड्या महत्त्वाचे समजल्या जाते. मात्र एखादी विवाहिता जर अशा सौभाग्यलक्षणांचा स्वीकार करीत नसेल तर याचा अर्थ तीला तो विवाह मंजूर नाही असा समजल्या जात नाही.

ऊलट एक क्रांतिकारी बाब समजल्या जाते. पूर्वी पतीच्या निधनानंतर पत्नीने आत्मदाह करण्याची म्हणजे सती जाण्याची प्रथा राजस्थान राज्यात होती. ब्रिटिशांच्या पुरोगामी विचारांमुळे देशात सतीप्रथा आणि बालविवाह तसेच पतिनिधनानंतर केशवपनाची प्रथा बंद करण्यात आली. असे असले तरी आजही राजस्थानमध्ये सतीचे मंदिरआहे.राजस्थानचेच कशाला, यवतमाळ सारख्या पुरोगामी शहरातही सतीचे मंदिर असून तिच्या पूजेसाठी गर्दी होत असते .आजही अशा प्रकारची मानसिकता कायम आहे याला काय म्हणावे? याठिकाणी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो असा की गांधीवादी क्रांतिकारी पुरोगामी विचारक दादा धर्माधिकारी यांनी स्त्रियांनी सौभाग्यचिन्ह वापरू नये यासाठी चळवळ सुरू केली होती. ही लक्षणे म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्थेतील  गुलामीची चिन्हे आहेत असे विचार  एका शिबिरात त्यांनी मांडले होते. दादांच्या या विचारांच्या प्रभावामुळे १९७४  मध्ये पांढरकवडा येथील राज्यशास्त्राच्या प्राध्यापक माया देशपांडे यांनी शेतकरी नेते सुधाकर जाधव यांच्याशी  प्रेमविवाह केला होता. कपाळी कुंकू लावणे, हातात बांगड्या घालणे  आणि गळ्यात मंगळसूत्र घालणे या गोष्टींना नकार दिला होता. शेतकरी नेते सुधाकर जाधवही या चळवळीतून पुढे आले आहेत. प्रा. माया देशपांडेच नव्हे तर त्याकाळात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीत काम करणाऱ्या अनेक तरुणींनी आंतरजातीय प्रेमविवाह केले आणि ही सर्व सौभाग्याची लक्षणे नाकारून आज तागायत त्यांनी आपले विचार बदलले नाहीत. अशा तरुणींमध्ये तेव्हा यामिनी चौधरी आणि श्याम मानव, माया कुलकर्णी आणि शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांचेही विवाह अशाच स्वरूपाचे आहेत.

प्रा. न. मा.जोशी
याशिवाय शैला सावंत जयश्री आवटे दिघे अरुणा तिवारी सुनंदा आणि तारका मायलेकी अशी अनेक नावे सांगता येतील. या सर्व पार्श्वभूमीवर गुवाहाती उच्च न्यायालयाचा निर्णय बाकी अजबच म्हटला पाहिजे. कुंकू बांगड्या आणि मंगळसूत्र आसाम आसाम हीच विवाहितेची ओळख आहे काय? गुवाहाती असा प्रश्न विचारल्या शिवाय रहावत नाही. बाय द वे ,विवाहीत महिलेने कपाळी कुंकू लावणे किती महत्वाचे याचा हा एक मजेदार किस्सा वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना! सौभाग्यवती शालिनीताई पाटील ह्या कपाळावर भले मोठाले कुंकू लावत.  वसंतदादा पाटील जेव्हा लोकसभेचे सभासद असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला होता .विधानसभेचे सभासदत्व प्राप्त व्हावे यासाठी शालिनीताई पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागी अनुक्रमे शालिनीताई पाटील आणि वसंतदादा पाटलांनी निवडणूक लढविली दोघेही अनुक्रमे खासदार आणि आमदार म्हणून निवडून आले. पुढे दोघांचे इतके बिनसल की एका  मराठी साप्ताहिकाने पहिल्या पानावर कव्हर स्टोरी लावली होती. त्यात शालिनीताई  पाटील यांचा फोटो छापला होता. त्यांच्या कपाळावर जे भलेमोठे कुंकू दाखवले त्या ठिकाणी वसंतदादा पाटील यांचा फोटो दाखवला होता. त्या फोटो खाली एक ओळ छापली होती. नावाचचं कुंकू ! वाचक जे काय समजायचे ते समजून गेले होते.
लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad