Post Top Ad
शुक्रवार, ३ जुलै, २०२०
मिनी बसला रेल्वेची धडक; भीषण अपघातात १९ जण जागीच ठार
पेशावर येथून २२ शीख भाविक एका मिनी बसमधून नानकाना
येथील गुरूद्वारात प्रार्थनेसाठी गेले होते.
दर्शन झाल्यानंतर हे सर्व भाविक परत पेशावरकडे निघाले होते.परतीच्या प्रवासात
असताना सच्चा सौदा फारूकाबाद शेखुपुरा येथील मानवरहित रेल्वे
क्रॉसिंगवर त्यांच्या मिनी बसला भरधाव एक्स्प्रेस
गाडीनं उडविल्याने त्यात तब्बल १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात एका एक्स्प्रेस
रेल्वेगाडीनं शीख भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला
धडक दिली. या भीषण अपघातात १९ यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. यात ८ जण गंभीर जखमी
झाले असून, त्यांच्यावर
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाहोरपासून ६० किमी
अंतरावर ही घटना घडली. या घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.
“पाकिस्तानातील शीख भाविकांच्या मृत्यूमुळे दुःखी झालो आहे. दुःखाच्या क्षणी माझ्या सहवेदना मृतांचे कुटुंबीय व
मित्रांच्यासोबत आहे. जखमी
झालेले भाविक लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो,” असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. शाह हुसैन एक्स्प्रेस
ही रेल्वे गाडी कराचीहून लाहोरला जात होती. त्याचवेळी मिनी बस समोर आली. लाहोरपासून
६० किमी अंतरावर ही घटना घडली. यात मिनी बसमधील १९ भाविक जागीच ठार झाले. तर
८ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response