Post Top Ad
रविवार, २६ जुलै, २०२०
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रपूर जिल्हाच्या दौऱ्तावर
चंद्रपूर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक २७ जुलै सोमवार व २८ जुलै मंगळवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादिवशी ते विविध विभागाचा आढावा घेणार आहेत.
सोमवार दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ८.४५ ला नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता चंद्रपूर येथे आगमन व सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथे कोरोना संदर्भातील उपाययोजनांसंदर्भात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सकाळी १२ वाजता नियोजन भवन येथे सहयोग मानसिक आरोग्य हेल्पलाइनचे उद्घाटन करतील. दुपारी १२.३० वाजता आयुष उपक्रमाबाबत आढावा बैठक व उद्घाटन करणार आहेत.
दुपारी १ वाजता मंथन हॉल, चंद्रपूर येथे पोलीस योद्धा कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. दुपारी १.३० ते २.३० वाजेपर्यंत राखीव वेळ ठेवण्यात आला असून दुपारी २.३० वाजता सिसीसी , वन अकादमी आणि आदिवासी मुलींचे वस्तीगृहास भेट देतील. दुपारी ३.३० वाजता खरीप हंगाम, खते बियाणे, पिक कर्ज, पिक विमा याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक, बँक व्यवस्थापक, कृषी विकास अधिकारी यांच्याशी संबंधित कार्याचा आढावा ते घेणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता पालकमंत्री कार्यालय, नियोजन भवन, चंद्रपूर येथे राखीव व रात्री हिराई विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.
मंगळवार २८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता ताडाळी येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील टेस्टिंग उद्घाटन कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्र, ताडाळी येथे उपस्थित राहतील. सकाळी ११.३० वाजता डब्ल्यूसीएल एम्प्लॉयमेंट संदर्भात नियोजन भवन येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतील. दुपारी १२.३० वाजता विविध विकास कामांचा आढावा नियोजन भवन चंद्रपूर येथे घेणार आहेत. दुपारी १.३० ते २ वाजेपर्यंत राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. दुपारी २ वाजता विविध महामंडळाच्या योजनांचा आढावा नियोजन भवन चंद्रपुर येथे घेणार आहेत . दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद नियोजन भवन, चंद्रपूर येथे घेणार आहेत. दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता नियोजन भवन चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण करतील.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response