Breaking

Post Top Ad

रविवार, ५ जुलै, २०२०

देशातील नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी



देशातील नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी
रविवारी भारताच्या नावे नको ते विक्रम नोंदवला गेला. सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला.भारत रशियाला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. Covid19india.org च्या माहितीनुसार भारतातील रुग्णांची संख्या वाढून रविवारी ६ लाख ९० हजार ३९६ एवढी झाली आहे जॉन हॉपकिंन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रशियातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ लाख ८० हजार २८२ एवढी झाली आहे.

महाराष्ट्रात २ लाखांच्यावर रुग्ण
देशातील एकूण रुग्णांपैकी २ लाखापेक्षा जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात रविवारी ६५५५ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण संख्या आता २ लाख ६ हजार ६१९ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ३ हजार ६५८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख ११ हजार ७४० रुग्ण आतापर्यंत कोरोनातून बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८६ हजार ४० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत,” अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सध्या अमेरिका २,८४४१,१२४ रुग्णसंख्येसह पहिल्या स्थानावर असून, ब्राझील १,५७७,००४ रुग्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या व दुसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिका व ब्राझीलमधील कोरोना बाधिताच्या रुग्णसंख्येत व भारतातील रुग्णसंख्ये मोठं अंतर असला, तरी गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याच प्रमाण लक्षणीय वाढले आहे. 

जून महिन्याच्या अखेरच्या १२ दिवसातच देशात २ लाख रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आकडेवारीनं भारताच्या चिंतेत मोठी भर टाकली आहे. संचारबंदीचे निर्बध शिथिल केल्यापासून देशात कोरोना बाधितांच्या दिवसाला लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले असून, रविवारची आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी ठरली आहे. 

Covid19india.org या संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या देशाच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या आधी रशिया तिसऱ्या स्थानी होता. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून, दुसऱ्या स्थानी ब्राझील आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी दोन लाखांपेक्षा जास्त राज्यातील आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad