Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

नऊ लाखाचा गुटखा जप्त


नऊ लाखाचा गुटखा जप्त

सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना या महामारी साथ रोगाने थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने तंबाखू जन्य वस्तू वर बंदी घातली असताना ठाणे शहरात तब्बल नऊ लाख ५१ हजार १२० रुपयाचा गुटखा जप्त करून आरोपीना अटक करण्यात यश आले आहे. 

विमल गुटखा व तत्सम पदार्थावर बेकायदेशीर रित्या विक्री करण्यार शासनाने बंदी घातली असताना शुक्रवारी घोडबंदररोड येथील स्कायलाईन आर्केड बिल्डींग समोर आयशर टॅम्पो मध्ये अवैधरित्या बेकायदेशीर पणे गुटखा विक्री साठी घेवून जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कायदेशीर कारवाई करण्या करिता सापळा रचून आरोपी अमदज शौकतअली शेख वय ३२ वर्ष. रा. नुरकाटा जोगेश्वरी मंदिरा जवळ, डोंगरी खारीया, वापी, राज्य गुजरात येथे आयशर टॅम्पो ताब्यात घेवून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नऊ लाख ५१ हजार एकसे वीस रूपये किंमतीचा माल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेल्या मालाची किंमत बाजारमुल्य नुसार २२ लाख रूपये एवढी आहे. हि कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह आयुक्त डाॅ. सुरेश कुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार, उप आयुक्त दिपक देवराज, सहा पोलीस आयुक्त एन. टी. कदम यांच्य मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, संजय शिंदे,अंकुश भोसले विकास घोडके आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad