यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात तसेच विविध ठिकाणी कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या२९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज (दि.26) सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात रविवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून २५ पॉझिटीव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
आज मृत झालेली महिला (वय ६०) ही आर्णी शहरातील मोमीनपुरा भागातील रहिवासी होती. तर नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या २५ जणांमध्ये १४ पुरुष आणि ११ महिला आहेत. यात पांढरकवडा शहरातील १० पुरुष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील भंडारी येथील एक पुरुष, पुसद शहरातील नवीन पुसद येथील एक महिला, वणी शहरातील एक पुरुष व एक महिला, यवतमाळ शहरातील टॅक्सी नगर येथील एक पुरुष आणि नेर शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी ९३ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने १२६८५ नमुने पाठविले असून यापैकी ११४४७ प्राप्त तर १२३८ अप्राप्त आहेत. तर १०७०३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात शनिवारपर्यंत २४२ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह होते. यात आज २ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा २६८ वर पोहचला. मात्र एकाचा मृत्यु झाल्याने व 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या २९ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २३८ आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे २१२ तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले २६ जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ७४४ झाली आहे. यापैकी ४८० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २६ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ६७ जण भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response