रविवारी सामना या दैनिकातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दुसरी मुलाखात प्रकाशीत झाली. ही मुलाखात शिवसेनेचे खासदार आणि सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. दुसऱ्या मुलाखातीत शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले असून पाकिस्तान पेक्षा भारताचा शत्रू क्रमांक एकचा चीन आहेत. चीन आर्थिकदृष्ट्या मजबूत झालंय. त्यांच टार्गेट आता भारत आहे. म्हणजे मोदींनी तिथे जाऊन त्यांच्या सोबत दोस्ती केली. त्यांना इथे आणून झोपाळ्यावर बसवलं आणि भारतीय कपडे शिवळे. हे सगळे करून आपण खूप मोठं काहीतरी घडवून आणलंय असं चित्र 'निर्माण' केले. एकमेकांच्या हातात हात घालून, गळाभेट करून दोन्ही देशांची दोस्ती होतेय असं चित्र निर्माण केलं, पण गळाभेट ठिक आहे. शेकहॅण्डही ठिक आहे. पण अशाने दोन देशामंधले सगळे प्रश्न सुटत नसतात हे आता आपल्या लक्षात आलंय असं शरद पवार यांनी सांगितलं.
शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम, केंद्र सरकारच्या कारभाराची पद्धत आणि भारत-चीनच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं आहे.
अर्थव्यवस्था साफ कोसळली आहे. ती सावरण्यासाठी देशाला आणखी एका मनमोहन सिंगांची गरज आहे. पण मोदी सरकारला तज्ज्ञांचे सल्ले नकोत!
केंद्राने राज्यांना मदत करायला पाहीजे. हा राज्याचा गाडा पुन्हा उभा करण्यासाठी केंद्राने मदत द्यायला हवी. ती केंद्राचीच जवाबदारी आहे. केंद्राचे उत्पन्नाचे तरी मार्ग काय असतात? त्यांच्या सगळ्या उत्पन्नाचे मार्ग राज्यांतूनच आहेत. राज्यांची अर्थव्यवस्था, राज्याचे व्यवहार, राज्याचे उत्पादन हे गतिमान झालं तर त्याच्यातून राज्याचं उत्पन्न निर्माण होईल आणि त्याचाच भाग केंद्राला मिळणार आहे. त्यामुळे केंद्राला आपलं दुकान चालवण्यासाठी सुध्दा राज्यांची दुकाने चालवली पाहिजे असे स्पष्ट मत 'सामना' ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
याच अनुषंगानं बोलताना पवारांनी देशातील इतर अर्थमंत्र्यांच्या कामाची आठवण सांगितली. 'देशासमोर जेव्हा संकटाचे प्रसंग येतात तेव्हा जो एक प्रकारचा संवाद लागतो तो सध्या दिसत नाही. प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना तासन् तास इतर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत. त्यांची मतं घेत. आता इतरांची मतं घेतली जातात की नाही माहीत नाही. वेगळ्या विचाराच्या लोकांना तिथं प्रवेश आहे असं दिसत नाही. कुणाशी चर्चा होत असेल तर त्याचा परिणाम कुठं दिसत नाही,' असंही पवार म्हणाले. 'काही लोकांच्या कामाची पद्धत असते. पण मोदींनी काही जाणकार लोकांची मदत घेऊन पावलं टाकायला हवी. ते नक्कीच सहकार्य करतील,' असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
'बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये हा फरक आहे'
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खुप मोठा फरक आहेत. शिवसेनाप्रमुखांची विचार शैली आणि निर्णय घेण्याची पद्धत वेगळी होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व थोडा वेगळं उद्धव हे शांत आणि संयमी नेते म्हणुन आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मोठा फरक आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशावर ओढवलेल्या आर्थिक संकटाबाबत पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी काही जाणकारांची मदत घेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक-दोनदा सर्वपक्षीय नेत्यांशी बोलणी केली आहेत. पण या संकटाची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यावर एकाच पक्षाच्या विचारानं उपाय शोधता येईल अशी भूमिका घेऊन चालणार नाही. ज्यांची ज्यांची मदत घेता येईल, त्यांची मदत घ्यायला हवी. मोदींच्या सध्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेक लोकांना अशा संकटात काम करण्याचा अनुभव नाही. खरंतर तो आम्हालाही नाही. पण या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्वांची साथ घेण्याच्या बाबतीत सरकार कमी पडतेय,' असं पवार म्हणाले.
'नव्वदच्या दशकात देशावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. त्यातून देशाला बाहेर काढण्याचं काम तेव्हाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी केलं. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या पाठिंब्यानं त्यांनी नेहमीची चौकट सोडून निर्णय घेतले आणि अर्थव्यवस्था सावरली. आजही तशाच प्रयत्नांची गरज आहे. देशाला एका मनमोहन सिंगांची गरज आहे,' असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response