Breaking

Post Top Ad

मंगळवार, २१ जुलै, २०२०

पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचे;जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचे;जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणीकरीता जास्तीत जास्त नमुने पाठवा– जिल्हाधिकारी सिंह
यवतमाळ : दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तिचा शोध घेणे आवश्यक आहे. संपर्कात आलेल्या तसेच आरोग्य सर्व्हेमध्ये आढळलेल्या प्रत्येकाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले तर मानवी साखळी तोडण्यास मदत होईल. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त नमुने तपासणीकरीता पाठवा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात तालुकास्तरीय यंत्रणेशी व्हीसीद्वारे संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लीवार, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.

यवतमाळ येथील विषाणु संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) प्रत्येक तालुक्यातून दररोज किमान २५ ते ३० नमुने तपासणीकरीता आले पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जेवढ्या जास्तीत जास्त नमुन्यांची तपासणी होईल, तेवढे नागरिकांच्या दृष्टीने चांगलेच आहे. एका पॉझिटीव्ह रुग्णामागे त्याच्या संपर्कातील किमान ३० नमुने आलेच पाहिजे. यासाठी हाय-रिस्क, लो -रिस्क, आणि लो टू लो-रिस्क असे तीन भागात वर्गीकरण करा. पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिचे योग्य ट्रेसिंग केले तर प्रादुर्भाव पसरण्यास आळा बसेल. याशिवाय आरोग्य तपासणीदरम्यान ज्यांना तीन दिवस नियमित ताप, खोकला व इतर लक्षणे आढळल्यास अशाही व्यक्तिंचे नमुने प्रयोगशाळेत पाठवा. 
कोरोनाबाधित रुग्णाचा रिपोर्ट आयसीएमआर पोर्टलवर प्रिंट
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संशयीतांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. रुग्णालयामार्फत त्यांची विशेष काळजी घेण्यात येऊन देखभाल केली जाते. रुग्णालयाची स्वच्छता सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेळोवेळी करण्यात येते. तसेच कोरोनाबाधित रुग्णांचा प्रत्येक रिपोर्ट आयसीएमआर पोर्टलवरून प्रिंट करण्यात येतो. त्यामुळे रुग्णांलयाशी संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी. सिंग यांनी कळविले आहे.
पॉझिटीव्ह आलेला रुग्ण ज्या भागात राहत असेल तो भाग त्वरीत प्रतिबंधित करावा. या भागातील एकही व्यक्ति आरोग्य तपासणीमधून सुटता कामा नये. ग्रामस्तरीय समिती काळजीपूर्वक काम करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब आहे. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिचे तालुकास्तरावर ऑडीट करावे. वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होण्यापूर्वी सदर व्यक्ती उपचाराकरीता कोणत्या खाजगी दवाखान्यात गेला होता का. त्या खाजगी डॉक्टरांनी त्वरीत आरोग्य यंत्रणेला का कळविले नाही, याबाबत समितीने विचारणा करावी. कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये पॉझेटिव्ह असलेले मात्र ज्यांना लक्षणे नाही, असे रुग्ण तेथेच बरे होऊन घरी गेले पाहिजे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने काळजीपूर्वक काम करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad