Breaking

Post Top Ad

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

चिंताजनक: ९० जण पॉझिटीव्ह; ८३ जणांची मात

चिंताजनक: ९० जण पॉझिटीव्ह; ८३ जणांची मात

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या ८३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत २४ तासात जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून ९० नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी ३४५ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ४३८५१ नमुने पाठविले असून यापैकी ४३२८२ प्राप्त तर १५६९ अप्राप्त आहेत. तसेच ४०३६७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

मृत झालेल्या दोन जणांमध्ये दारव्हा शहरातील ८६ वर्षीय पुरुष आणि महागाव तालुक्यातील ८४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात २४ तासात नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ९० जणांमध्ये ४९ पुरुष आणि ४१ महिला आहेत. यात पुसद शहरातील नऊ पुरुष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील तीन पुरुष व एक महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष, आर्णी शहरातील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील नऊ पुरुष व दहा महिला, दिग्रस तालुक्यातील दोन पुरुष, महागाव तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील चार पुरुष, यवतमाळ शहरातील १० पुरुष व १२ महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील दोन महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व चार महिला पॉझिटीव्ह आले आहेत. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात ६४९ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर २३२ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २९१५ झाली आहे. यापैकी १९६४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ७० मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १९० जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad