Post Top Ad
रविवार, ९ ऑगस्ट, २०२०
कोरोनाचे जिल्ह्यात नव्याने १०४ जण पॉझिटीव्ह
यवतमाळ, दि. ९ ऑगस्ट : जिल्ह्यात आज नव्याने १०४ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले २४ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज रविवार ला मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६४ वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील शेनंद येथील ५० वर्षीय पुरुष आणि दिग्रस शहरातील शिवाजी नगर येथील ५३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १०४ जणांमध्ये ६४ पुरुष आणि ४० महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील १३ पुरुष व १० महिला, पांढरकवडा शहरातील २१ पुरुष व १४ महिला, झरी शहरातील चार पुरुष, उमरखेड शहरातील चार पुरुष व चार महिला, उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील एक पुरुष, पुसद शहरातील आठ पुरुष व चार महिला, पुसद तालुक्यातील कवाडीपूर येथील एक पुरुष व दोन महिला, हिवलानी तलाव येथील दोन पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील एक पुरुष, आर्णी शहरातील एक पुरुष व एक महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व दोन महिला, वणी तालुक्यातील राजूरा येथील एक महिला, नेर शहरातील एक पुरुष आणि नेर तालुक्यातील घारफळ येथील चार पुरुष व दोन महिला पॉझिटीव्ह आल्या आहेत.
जिल्ह्यात रविवारी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या २४ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४१६ आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १५९८ झाली आहे. यापैकी ११३८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ४४ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १२८ जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी ३१ नमुने पाठविले असून सुरवातीपासून आतापर्यंत २६४१४ नमुने पाठविले आहे. यापैकी२३७९३ प्राप्त तर २६२१ अप्राप्त आहेत. तसेच २२१९५ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response