Breaking

Post Top Ad

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यात पुन्हा ११२ जण पॉझिटीव्ह

जिल्ह्यात पुन्हा ११२ जण पॉझिटीव्ह

यवतमाळ : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात  दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला तर ११२ नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. मृत झालेल्यांमध्ये आर्णी शहरातील ६५ वर्षीय महिला आणि पांढरकवडा शहरातील ८५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ होत आहे.त्या अनुषंगाने नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हा कोरोना मुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी १९५ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ४९३४० नमुने पाठविले असून यापैकी ४६७५२ प्राप्त तर २५८७ अप्राप्त आहेत. तसेच ४३३५४ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ११२ जणांमध्ये पुरुष ७० तर महिला ४२ आहेत. यात दिग्रस शहरातील सात पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील दोन पुरूष, आर्णी तालुक्यातील तीन पुरूष व दोन महिला, दारव्हा शहरातील चार पुरूष व दोन महिला, दारव्हा तालुक्यातील १३ पुरूष व सहा महिला, यवतमाळ शहरातील सात पुरुष व चार महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरूष, नेर शहरातील चार पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील चार पुरूष व तीन महिला, कळंब तालुक्यातील एक महिला, महागाव तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील १५ पुरूष व सात महिला, पांढरकवडा शहरातील तीन पुरूष व एक महिला, वणी शहरातील सहा पुरूष व १४ महिलांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ७९० ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये २२७ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ३३९९ झाली आहे. यापैकी २४६२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ८४ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १९४ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad