शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरुवारी ११८ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ३९२४१ नमुने पाठविले असून यापैकी ३८७९४ प्राप्त तर ४४७ अप्राप्त आहेत. तसेच ३६३१३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
Post Top Ad
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०
जिल्हात चोवीस तासात ११५ जण पॉझिटीव्ह
जिल्हा सह राज्यात दिवसं दिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना नागरिक मात्र गांभीर्याने घेत नाही. सरकार आणि प्रशासनाना कडून वारंवार कोरोना संदर्भात जनजागृती करून संसर्ग टाळण्यासाठी आवाहन करण्यात येत असताना नागरिक मात्र त्या कडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. कोरोना ला हरवण्यासाठी नागरिकांनी गांभीऱ्यांने नियम पाळणे गरजेचे आहे.
यवतमाळ, दि. २० ऑगस्ट रोजी जिल्ह्यात गत २४ तासात ११५ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले २५ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज (दि. 20 ऑगस्ट रोजी नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ११५ जणांमध्ये ७५ पुरुष आणि ४० महिला आहेत. यात दिग्रस शहरातील सात पुरूष व १० महिला, नेर शहरातील एक पुरूष व एक महिला, पुसद शहरातील दोन पुरूष व दोन महिला, पुसद तालुक्यातील एक पुरूष, वणी शहरातील नऊ पुरूष व तीन महिला, वणी तालुक्यातील एक पुरूष, आर्णी शहरातील तीन पुरूष व चार महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरूष, यवतमाळ शहरातील १५ पुरूष व आठ महिला, दारव्हा शहरातील १३ पुरूष व एक महिला, पांढरकवडा शहरातील तीन पुरूष व दोन महिला, बाभुळगाव शहरातील पाच पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष, महागाव शहरातील पाच पुरूष व पाच महिला, उमरखेड शहरातील सहा पुरूष एक महिला, घाटंजी शहरातील दोन महिला, राळेगाव तालुक्यातील एक महिला व किनवट शहरातील एक पुरूषाचा समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ६८१ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती तर १४१ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २४८२ झाली आहे. यापैकी १५९८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ६२ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १५५ जण भरती आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response