शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी ६० नमुने पाठविले असून सुरवातीपासून आतापर्यंत २९०११ नमुने पाठविले आहे. यापैकी २७७४१ प्राप्त तर १२७० अप्राप्त आहेत. तसेच २५८५५ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
Post Top Ad
मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०
जिल्हात पुन्हा आढळले १२७ पाॅझिटिव्ह रूग्ण
यवतमाळ, दि. ११ ऑगस्ट नव्याने १२७ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले ३३ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील वडगाव येथील ५० वर्षीय पुरुष, उमरखेड शहरातील वॉर्ड क्रमांक १ मधील ६५ वर्षीय पुरुष आणि आर्णि शहरातील मोमीनपुरा येथील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १२७ जणांमध्ये ६९ पुरुष व ५८ महिला आहेत.
यात यवतमाळ शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील एक पुरूष व एक महिला, पिंपळगाव येथील एक महिला, मनिपाडा येथील एक पुरूष, साने गुरूजी नगर येथील एक महिला, पाटीपुरा येथील एक पुरूष, दलीत सोसायटी येथील एक पुरूष, यवतमाळ शहराच्या इतर भागातील सहा पुरूष व सात महिला, वणी शहरातील चार पुरूष, उमरखेड ढाणकी येथील एक महिला, उमरखेड शहरातील सहा पुरूष व पाच महिला, पुसद तालुक्यातील इसापुर येथील दोन महिला, श्रीरामपुर येथील एक पुरूष, पुसद शहरातील सुभाष वार्ड येथील एक पुरूष व चार महिला, शिवाजी वार्ड येथील एक महिला, बालाजी पार्क येथील एक पुरूष व दोन महिला, पुसद शहराच्या इतर भागातील १२ पुरूष व ११ महिला, पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथील एक पुरूष, पांढरकवडा शहरातील १३ पुरूष व १२ महिला, नेर शहरातील खडकपुरा येथील एक पुरूष व शहराच्या इतर भागातील दोन पुरूष, महागाव तालुक्यातील बेरदरी येथील नऊ पुरूष व पाच महिला, घाटंजी तालुक्यातील अकोला बाजार येथील एक पुरूष, दिग्रस शहरातील तीन पुरूष व एक महिला, दारव्हा शहरातील चार पुरूष व दोन महिला, राळेगाव येथील एका महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात मंगळवारी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 33 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ५८७ आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १८८६ झाली आहे. यापैकी १२५० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ४९ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १४२ जण भरती आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response