Breaking

Post Top Ad

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

२५ जण नव्याने पॉझिटीव्ह

२५ जण नव्याने पॉझिटीव्ह
यवतमाळ, दि.१९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात बुधवारी नव्याने २५ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली तर  दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालायाच्या आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण ५९३ पॉझिटीव्ह रुग्ण भरती आहेत.

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ तालुक्यातील सावळा येथील ५२ वर्षीय पुरुष आणि नेर येथील ९० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या २५ जणांमध्ये १९ पुरुष आणि ६ महिला आहेत. यात आर्णी शहरातील वार्ड नंबर 1 मधील एक पुरूष, तालुक्यातील अमराजपुर येथील एक पुरुष, यवतमाळ तालुक्यातील पिंपरी येथील एक महिला, सुकळी येथील एक महिला, यवतमाळ शहराच्या वैद्य नगरातील एक पुरूष, पुसद शहरातील न्यू पुसद मधील एक पुरूष, मोती नगर येथील दोन पुरूष व एक महिला, पार्वती नगर येथील एक पुरूष, द्वारका नगरी श्रीरामपुर येथील एक पुरूष व दोन महिला, आंबेडकर नगर येथील एक पुरूष, पुसद शहराच्या इतर भागातील तीन पुरूष व एक महिला, दारव्हा शहरातील दोन पुरूष, वणी शहरातील तीन पुरूष, पांढरकवडा शहरातील एक पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष यांचा समावेष आहे.

जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ५९३ असून होम आयसोलेशनमध्ये १३९ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २३६७ झाली आहे. यापैकी १५७३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ६२ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १५५ जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी १०१ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ३८१२० नमुने पाठविले असून यापैकी ३७४९४ प्राप्त तर ६२६ अप्राप्त आहेत. तसेच ३५१२७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad