Breaking

Post Top Ad

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

नव्याने ३० जण पॉझिटीव्ह; १४३० जणांची कोरोनावर मात

नव्याने 30 जण पॉझिटीव्ह; 1400 जणांची कोरोनावर मात
यवतमाळ, दि. १६ ऑगस्ट  : वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले १६ जण बरे झाल्यामुळे त्यांना आज रविवार ला  रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनावर मात करणा-यांची संख्या १४३० झाली आहे. तर गत २४ तासात जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून ३० जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी ६३ नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ३४३०४ नमुने पाठविले असून यापैकी ३३९३५ प्राप्त तर ३६९ अप्राप्त आहेत. तसेच ३१७६७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २१६८ पर्यंत पोहचली आहे. यापैकी तब्बल १४३० जण डॉक्टरांच्या अथक मेहनतीमुळे 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झाले आहे. गत २४ तासात जिल्ह्यात दोन मृत्यु झाले. यात यवतमाळ शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील ६० वर्षीय महिला आणि सेवा नगरातील ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ३० जणांमध्ये १६ पुरुष व १४ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील वडगाव येथील एक पुरुष, पाटीपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील दोन पुरुष व तीन महिला, वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील एक महिला, पुसद शहरातील सहा पुरुष व आठ महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील पिंपरी येथील एक पुरुष, वळफळी येथील एक पुरुष, वणी शहरातील तीन पुरुष व दोन महिला पॉझेटिव्ह आले आहेत.  

जिल्ह्यात गत २४ तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या १६ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ६७७ आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २१६८ झाली आहे. यापैकी १४३० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ५८ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १३५ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad