Post Top Ad
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
नव्याने ३३ जण पॉझिटीव्ह; एकाचा मृत्यू
२१ जणांना रुग्णालयातून सुट्टी
यवतमाळ, दि. ७ ऑगस्ट : जिल्ह्यात शुक्रवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युची एकूण संख्या ३८ झाली आहे. तसेच आज ३३ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून बरे झालेल्या २१ जणांना सुट्टी देण्यात आली आहे.
आज शुक्रवारी मृत झालेली व्यक्ती ही यवतमाळ शहरातील ७३ वर्षीय महिला आहे. तसेच जिल्ह्यात नव्याने आलेल्या ३३ पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये २० पुरुष आणि १३ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील सिंधी कॉलनी, कवर नगर येथील एक पुरुष, काळे ले-आऊट, वडगाव येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील दर्डा नगर येथील एक पुरुष, संभाजी नगर येथील एक पुरुष, नेहरु चौक येथील एक पुरुष व दोन महिला, तसेच यवतमाळ शहरातील एक पुरुष, पुसद तालुक्यातील पारडी येथील एक पुरुष व एक महिला, पुसद शहरातील मोती नगर येथील दोन पुरुष व एक महिला, महात्मा फुले वॉर्ड येथील दोन पुरुष, आंबेडकर नगर येथील एक पुरुष व एक महिला, नवीन पुसद येथील दोन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील मेन रोड येथील एक महिला, आखाडा वॉर्ड येथील एक पुरुष, पांढरकवडा येथील एक पुरुष व तीन महिला, दिग्रस तालुक्यातील लाख येथील एक महिला, दिग्रस शहरातील श्रीराम नगर येथील एक महिला, ताज नगर येथील एक पुरुष, वणी शहरातील मोमीनपुरा येथील एक पुरुष, उमरखेड शहरातील जामा मशीद वॉर्ड येथील एक पुरुष तसेच जिल्ह्यातील अन्य ठिकाणचा एक पुरुष आज पॉझिटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधित रुग्णांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ३३७ ऐवढी आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १३९० झाली आहे. यापैकी १०१५ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १२२ जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत २३३९७ नमुने पाठविले असून यापैकी १९८४१ प्राप्त तर ३५५६ अप्राप्त आहेत. तसेच १८४५१ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response