दि. ५ ऑगस्ट हा दिवस सोन्या सारखा दिवस असणार आहेत.राम मंदिराच्या आंदोलनात त्यावेळी पेटून अटलेले असंख्य दिवे(सेवक) विझले आहेत.मात्र ते स्वर्गातून बघत असतील तर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकीर उमटली असावी.
शरयू नदीत अंघोळ करतांना माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार |
प्रभू श्रीरामाला स्वतःच्या जागेत प्रस्थापीत होण्यासाठी वर्षा न वर्ष चालु असलेल्या लढ्यामध्ये सहभागी झालेले यवतमाळ- आर्णीतील कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त करता वेळीच्या आठवणींचा दाखला देतानाच कोरोना प्रस्थितीत सुधारल्या नंतर पुन्हा आठ दिवस अयोध्येत सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देशात सगळीकडे रामजन्म भूमि आंदोलनाला वेग आला होता. देशभरातून लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले असताना यवतमाळ जिल्हातील आर्णी, कोपरा, चिखली, गणगांव आदी गावातून तब्बल ४२ कारसेवकांनी बाबरी पाडण्यासाठी गेले होते. कारसेवकांच स्वप्न आज पुर्ण झाल्या बदल त्यांनी खुप आनंद व्यक्त केला आहे.
पिढ्यानुपिढ्या अडगळीत टाकलेल्या श्रीराम मंदिराची वाट मोकळी झाली.पण हे नेत्रदीपक सोहळा बघायला आमचा "वाघ" नाही. याचे दुःख तालुक्यातीलच काय अवघ्या मराठी मुलुखात होत आहे. होय.. माझ्या बहाद्दर शिवसैनिकांनी बाबरी पाडली याचा मला अभिमान आहे. म्हणुन शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. "जिंकू किंवा मरू" असा टोकाचा आणि पराकोटीचा निर्णय घेत राम मंदिरासाठी आपल्या जीवाची बाजी लावण्यासाठी बच्चा बच्चा सरसावला.
विवेक दहिफळे,कारसेवक |
दिपक शहाणे, विश्वहिंदू |
शरयू नदीत आंघोळ केल्या नंतर दुपारी बारा वाजता बाबरी चा ढाच्या पाडायला सुरूवात झाली. मी ढाच्या एक विट सोबत आणली आहे. एवढ्या वर्षानंतर प्रभू श्रीरामचा वनवास संपला याचा आनंद होतोय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response