जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक कोरोनाबाधीत रुग्णाला कोरोनामुक्त करणे यालाच जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे प्रत्यक्ष कोविड वार्डात जाऊन रुग्णांसोबत संवाद साधला. नुकतीच त्यांनी तीन दिवसा पूर्वी कोविड वार्डात भेट दिली होती व आज दि.१० ऑगस्ट ला पुन्हा त्यांनी कोविड वार्डातील पॉझिटीव्ह रुगणांसोबत संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह यांनी डॉ. पांचाळ यांना पीपीई किट घालण्यास देखील मदत केली. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी प्रत्येक रुग्णाची आस्थेवाईकपणे विचारणा केली. उपचार व्यवस्थीत होतो काय, डॉक्टरांच्या व्हिजीट किती वेळा होतात, जेवण, पाणी आदि व्यवस्था कशी आहे, याबाबत त्यांनी रुग्णांकडून माहिती जाणून घेतली. प्रत्येक आठवड्यात जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस करणार आहे. काही दिवसातच जिल्हाधिकाऱ्यांची ही आयासोलेशन वार्डात दुसरी भेट आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response