Breaking

Post Top Ad

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

अन्...नगरसेवक बसला खड्यात

अन्...नगरसेवक बसला खड्यात
संतोष पुरी हा नाव जिल्हासाठी काही नवीन नाही. गेली अनेक वर्ष पुरी यांनी वृत्तपत्रातून सडेतोड लिखाण करून जिल्हातच नव्ह तर राज्यात आपली वेगळी छाप उमटविली आहे. काही महिन्या आधी नुकताच ढाणकी नगर पंचायतीच्या निवडणूकीत उभे राहीले आणि भरघोष मतांनी निवडून सुध्दा आले. नगरसेवक म्हणुन जे प्रश्न सोडवायला पाहीजे ते सोडवण्यासाठी जीवाचे रान करणारे आणि वेळ प्रसंगी जनतेच्या हक्कासाठी मोठ्या अधिकारी सह नेत्यासोबत दोन हात करण्याची तयारी ठेवणारे नगरसेवक रस्ता दुरूस्तीच्या मागणी साठी चक्क आगळा वेगळा आंदोलन करून चिखलात बसून प्रशासनाचे लक्ष वेधले त्यामुळे नगरसेवक  संतोष पुरी यांनी केलेल्या आंदोलनाची जिल्हातील प्रशासनात मोठी चर्चा होत आहे.

उमरखेड तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या ढाणकीत नागरी सुविधांचा प्रचंड अभाव आहे. नगर पंचायत असलेल्या ढाणकित पावसाळ्यात अनवाणी पायाने चालता येईल याची सोय नसलेल्या प्रभाग १७ मधील रस्त्यावर अनेक जण पडले. वारंवार सांगून रस्त्याची चालण्यायोग्य डागडुजी देखील होत नसल्याने नगरसेवक संतोष पुरी चक्क रस्त्यावरील खड्ड्यात ठिय्या मांडून बसल्याने नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर शेवटच्या टोकाला असलेल्या ढाणकी शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. शिवाय नव्यानेच झालेल्या ढाणकी नगर पंचायत मध्ये सुरू असलेले सत्ताधाऱ्यांचे मनमानी राजकारण ढाणकीकरांच्या जीवावर उठले आहे. ढाणकीत रस्ते, नाली, पाणी, स्वच्छता, आरोग्य, सार्वजनिक मुतारी असे अनेक प्रश्न भेडसावले आहेत, मात्र एकदा सत्ता मिळाली की अर्थार्जन एकमेव धर्म असे अघोषित धोरण अवलंबत कारभार सुरू आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक तथा भाजपाचे गटनेते संतोष पुरी यांनी प्रभागातील अडचणींवर प्रशासनाला जाब विचारला. प्रसंगी स्वतः फावडे घेवून नाली उपसण्यासाठी निघणे, नगर पंचायत कार्यालयात कचरा टाकणे आणि आता चिखलात बसून गांधीगिरी करत रस्त्याच्या डागडुजीची मागणी करणे या आणि अश्या अभिनव आंदोलनामुळे स्वतः ची वेगळी लढवैया ओळख निर्माण करणारे पुरी यांनी खड्यात बसून प्रभाग क्रमांक १७ सह गावातील सर्वच रस्ते किमान चालण्यायोग्य बनवा अशी प्रशासनाकडे मागणी केली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या रस्त्यावर विहीर आहे, ज्याला कठडा देखील नाही त्यामुळे येथे गंभिर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad