Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

अन्.. "सिंह" चक्क कोरोना रूग्णांना भेटतो तेव्हा...

अन्.. "सिंह" चक्क कोरोना रूग्णांना भेटतो तेव्हा...
गेल्या काही महिन्या पासून कोरोना या नावाच्या साथरोगाने चांगलेच डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्हात अनेकांना कोरोना झाला. यवतमाळ येथील कोविड रूग्णालयात चक्क "सिंह" कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना भेटायला जातो तेव्हा मात्र एकच धावपळ सुरू होते. अशी घटना यवतमाळ येथील कोविड रूग्णालयात घडली. सिंह रूग्णालयात आल्याने यावेळी अनेकांनी आपला श्वास काही वेळा साठी थांबवला होता. सिंह अर्थात यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी अचानक कोविड रूग्णालयात एण्ट्री करून कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची विचारपुस केली.
गेल्या सहा चार-पाच महिन्या पासून कोरोना.. कोरोना...कोरोना...ऐकुन अगदी कानाचा पाला पाचोळा झाला आहे. आजही कोरोना बाधितांचा आकडा जगभरात फुगत आहे. दररोज अनेकांचे फोटो भिंतीवर टाकले जात आहे.याला यवतमाळ जिल्हा तरी कसा अपवाद असू शकेल. जिल्ह्यात सातत्याने रूग्ण गवसत आहेत.रूग्णालयात त्यांची योग्य सुश्रुषा व्हावी यासाठी स्वतः जिल्हाधिकारी एम.डी. सिंह जीव गुदमरून टाकणारी पीपीई किट घालुन आणि अतिशय जोखीम पत्करून रुग्णालयातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणुन घेत रुग्णालयातील कोरोना योद्धांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून रूग्णांची योग्य काळजी घेण्याची सुचना दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचं करावं तेवढं कौतुक कमीच

कोरोनाच्या संकटात चार भिंतीच्या आतून प्रशासनाला आदेश देत आले असते.मात्र जिल्हाधिकारी सिंह स्वतः एक जागृत नागरिक समजून जातीने काम करित आहे. विशेष म्हणजे ते प्रसिद्धी पासून दोन हात लांब राहून काम करताय याचं मला खुप आनंद होतोय.
पराग पिंगळे, जिल्हाप्रमुख शिवसेना
अन्... सिंह चक्क कोरोना रूग्णांशी भेटतो तेव्हा... असे शब्द आपसुकच अनेकांच्या तोंडून निघत आहे. त्यामुळे सिमेंटच्या जंगलात त्या 'सिंहाचे' अर्थात जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांचे कौतुक होत आहे. जिल्हाधिकारी सिंह यांना आठ वर्षाचा मुलगा आहे. अशाही प्रस्थितीत त्यांनी जीव धोक्यात टाकून कोरोना रूग्णांना आणि रुग्णालयातील कोरोना योद्धांना भेटून प्रस्थितीत जाणुन घेणे याला खुप मोठी हिम्मत लागते. जिल्हाला अशा कर्तव्यदक्ष अधिकारी मिळणे हा जिल्ह्यातील नागरिकांचा नसीबच समजावा.

जिल्हाधिकारी प्रसिद्धी पासून दोन हात लांबच
जिल्हाचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम. डी. सिंह कोरोनाच्या संकटात प्रसिद्धी माध्यमांपासून दोन हात लांबच राहत आहे. रूगाणालय सह प्रत्येक तालुक्यात जावून सिंह प्रस्थितीत जाणुन घेताय मात्र माहितीधिकारी च्या माध्यमातून कधीही प्रसिद्धी पत्रक काढून मार्किंटग करण्याचा काम त्यांनी केले नाही. काही दिवसा आधी कोरोना रूगांची गैरसोय होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर कुठलाही विलंब न करता स्पष्टीकरण दिले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad