Breaking

Post Top Ad

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

निळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू

निळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू
राज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सकाळी दरम्यान घडली.
यवतमाळ येथील आदिवासी सोसायटीमध्ये वास्तव्यात असणाऱ्या दोन तरुणाचा आज यवतमाळ लगत असणाऱ्या निलोना धरणांमध्ये बुडून मृत्यू पावल्याची दुःखद घटना घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार यवतमाळ येथील आदिवासी सोसायटी मधील दोन तरुण विशाल आडे व वृषभ कनाके हे सकाळी निळोणा धरणावरती गेले असता, त्यांचा पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे दोघेही ही धरणाच्या भिंतीलगत उतरले असता दोघेही खोल पाण्यात गेले. एकमेकांना  वाचविण्यात विशाल व वृषभ नामक युवक मृत्यू पावल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन प्रेत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad