जिल्हात सध्या कोरोना चा उद्रेक सुरू असून सोमवारी पुन्हा ९४ जण पॉझिटीव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
यवतमाळ : जिल्ह्यात गत २४ तासात ९४ नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ४७ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी १३० नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ४२५८० नमुने पाठविले असून यापैकी ४१४४१ प्राप्त तर ११३९ अप्राप्त आहेत. तसेच ३८७२७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६७ वर्षीय महिला आणि पुसद शहरातील ६० वर्षीय पुरुष आहे. नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ९४ जणांमध्ये ६० पुरुष व ३४ महिला आहेत. यात बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष, आर्णी शहरातील तीन पुरूष व एक महिला, यवतमाळ शहरातील १९ पुरूष व नऊ महिला, पुसद शहरातील १४ पुरूष व सात महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरूष, दारव्हा शहरातील एक पुरूष, वणी शहरातील चार पुरूष व ११ महिला, महागाव तालुक्यातील पाच पुरूष व एक महिला, उमरखेड शहरातील एक पुरूष, दिग्रस शहरातील १० पुरूष व पाच महिलांचा समावेष आहे.
महागांवचे मुख्याधिकारी पाॅझिटिव्ह
कोरोनाचा उद्रेक सुरू असताना महागांव येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सोमवारी पाॅझिटिव्ह आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली.अशात जीवाची परवा न करता जिल्हाचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी महागांव येथे दुपारी दरम्यान भेट दिली. दरम्यान शहरातील सर्व प्रस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उमरखेड शहरातील प्रस्थितीचा सुध्दा आढावा घेत काही महत्त्वाच्या सुचना देखील केल्या.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ५९२ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर १९६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २७१४ झाली आहे. यापैकी १८५० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ६६ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १७३ जण भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response