किशोर तिवारींना अप्रत्यक्षपणे भाजप आमदारांनी सुनावलं
|
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कडे केलेला पाठपुरावा |
कोरोना महामारीवर नियंत्रणा साठी लावण्यात आलेल्या संचारबंदी मुळे हवालदिल झालेल्या लाखो आदिवासी आणि वनवासी पाड्यातील कुटुंबातील एक कोटी पंचवीस लाख पेक्षा लोकसंख्या असलेल्या अनुसूचित जमातीच्या लोकांना आदिवासी खावटी कर्जासाठी अनुदान देण्यात यावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे राज्यातील एकमेव आणि आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डाॅ. संदीप धुर्वे यांच्या पाठपुरावा नंतर सव्वा कोटी आदिवासींच्या कुटूंबाला प्रत्येक चार हजार रूपये अनुदान मिळाले. मात्र याचे श्रेय किशोर तिवारी यांनी घेतल्याने भाजप आमदार डाॅ.धुर्वे यांनी अप्रत्यक्ष पणे पाठपुरवा केल्याचा पुरावा जगजाहीर करण्याचे आवाहन तिवारींना केले आहे.
|
आदिवासी विकास मंत्री यांना दिलेला पत्र
|
किशोर तिवारी हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाही, तरी देखील त्यांनी आयत्या बीळात नागोबा होणे योग्य नसल्याचे आमदार डाॅ. संदीप धुर्वे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे किशोर तिवारी यांनी सोशल मिडीयावर या संदर्भात माहिती व्हायरल करून काही माध्यमातून तशी बातमी प्रकाशित करून आणली त्यामुळे आर्णी-केळापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार डाॅ. संदीप धुर्वे यांनी नाराजी व्यक्त करित तिवारींनी पाठपुरावा केल्याचे पत्र जगजाहीर करण्याचे आवाहन केले आहे.त्यामुळे किशोर तिवारी सव्वा कोटी आदिवासी कुटुंबाला प्रत्येकी चार हजार रूपये अनुदान मिळवून दिल्याचे पुरावे देणार का हे पहाणे गरजेचे आहे.
|
आदिवासी विकास सचिवांना दिलेलं पत्र
|
दरम्यान भाजपचे आमदार डाॅ संदीप धुर्वे यांनी बोलतांना पुढे म्हणाले की, मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक वेळा पत्रव्यवहार केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपसचिव जाधव यांच्याशी माझं बोलणं करून दिले. त्यानंतर आदिवासी खावटी कर्जला अनुदान देण्याच्या कामाला वेग आला. दरम्यान मी,स्वतः संबधित विभागाच्या सचिवाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. तेव्हा कुठे हा विषय सुटला. मला जनतेनी काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेला माहिती आहेत.काम कोण करतो ते. मी प्रसिद्धी साठी कधीच काम करित नाही, अशा शब्दात अप्रत्यक्षपणे किशोर तिवारींवर आमदार धुर्वे यांनी सुनावलं.
|
आदिवासी आयुक्त कडे केलेला पत्रव्यवहार |
भाजप आमदार डाॅ.संदीप धुर्वे यांनी आदिवासी समाजातील लोकांना खावटी कर्ज अर्थात अनुदान मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुरावा वरून नक्की लक्षात येते की, आमदार डाॅ. धुर्वे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुरावा मुळेच सव्वा कोटी आदिवासी लोकसंखेच्या १२ लाख कुटुंबांना सरसकट चार हजार रूपये प्रती कुटूंबाच्या खात्यात जमा झाले ते केवळ भाजप आमदार धुर्वे मुळेच मात्र याचं श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याने आमदार डाॅ संदीप धुर्वे प्रसिद्धी पासून दोन हात लांब राहिले हे पण तेवढेच खरे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response