जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्युचा आकडा फुगत असून दररोज पाॅझिटिव्ह रूग्ण सुध्दा आढळून येत आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी कोरोना संदर्भात जागृत राहणे आवश्यक आहे. जिल्हातील नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे.
मृत झालेल्यांमध्ये आर्णी तालुक्यातील ३६ वर्षीय पुरुष, आर्णी शहरातील ५५ वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा शहरातील ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात गत २४ तासात नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ४३ जणांमध्ये २७ पुरुष व १६ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील १० पुरुष व १३ महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, आर्णी तालुक्यातील एक पुरुष, महागाव तालुक्यातील एक पुरुष, पुसद शहरातील चार पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील नऊ पुरुष व एक महिला आणि पांढरकवडा शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ७१३ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर १५० जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ३१६५ झाली आहे. यापैकी २२२३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ७९ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १५६ जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी ६० नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ४७३९२ नमुने पाठविले असून यापैकी ४५६०६ प्राप्त तर १७८६ अप्राप्त आहेत. तसेच ४२४४१ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response