Breaking

Post Top Ad

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

खुशखबर: ४१ जणांना सुट्टी; ४५ जण नव्याने पॉझिटीव्ह


खुशखबर: ४१ जणांना सुट्टी; ४५ जण नव्याने पॉझिटीव्ह
शुक्रवारी कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी जरी आढळली तरी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी काळजीने आणि जवाबदारीने प्रस्थितीतीला समोर गेल्यास काही दिवसात जिल्हा कोरोना मुक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्या अनुषंगाने सर्वांनी स्वतःची काळजी घेत कोरोना हद्दपार करण्याच्या दृष्टीने शासनाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

यवतमाळ, दि. १४ : जिल्ह्यात २४ तासात नव्याने ४५ पॉझिटीव्ह  रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले ४१ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एका कारोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युची एकूण संख्या ५४ झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ३३५८९ नमुने पाठविले आहे. यापैकी ३३०७८ प्राप्त तर ५११ अप्राप्त आहेत. तसेच ३१००० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
आज शुक्रवारी मृत झालेली महिला (वय ७५) ही पुसद शहरातील बेलोरो येथील आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ४५ जणांमध्ये ३१ पुरुष व १४ महिलांचा समावेश आहे. यात उमरखेड शहरातील कटकपुरा येथील एक पुरुष व शहरातील इतर ठिकाणचे तीन पुरुष, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एक पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष, दारव्हा शहरातील तीन महिला, दारव्हा शहरातील डोल्हारी देवी परिसरातील सात पुरुष व तीन महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील दोन महिला, यवतमाळ शहरातील शासकीय वसाहत येथील एक पुरुष, शिवाजी चौक येथील एक पुरुष, वॉर्ड क्रमांक 1 येथील एक महिला, सुवर्णा नगरी येथील एक पुरुष तसेच शहरातील दोन पुरुष व एक महिला, यवतमाळ तालुक्यातील शेकलगाव येथील एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील डेहणी येथील एक पुरुष, नेर शहरातील मारवाडी चौक येथील एक महिला, शहरातील कानपूर येथील एक महिला, आर्णि शहरातील शास्त्री नगर येथील तीन पुरुष, महाकाली चौक येथील दोन पुरुष, मोमीनपुरा येथील दोन पुरुष, भीमनगर येथील एक पुरुष, जुनी वस्ती वॉर्ड क्रमांक 9 येथील एक पुरुष व मुबारकपुरा येथील एक पुरुष तसेच घाटंजी शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या ४१ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६३४ आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २०७८ झाली आहे. यापैकी १३८८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ५४ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १४८ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad