आर्णी भाजीपाला अडते पाॅझिटिव्ह निघाल्याने बाजार बंद
आर्णी येथील भाजीपाला ३ अडते कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्याने शहरातील भाजी हर्रास बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि अडते यांनी घेतला आहे. त्यामुळे भाजीपाला हर्रास किती दिवस बंद राहील या बाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.मृत झालेल्यांमध्ये दारव्हा शहरातील अंबिका नगर येथील ५८ वर्षीय पुरुष आणि कळंब तालुक्यातील माठा येथील ४९ वर्षीय पुरुष आहे. तसेच नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ७१ जणांमध्ये ४४ पुरुष व २७ महिलांचा समावेश आहे. यात पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील दोन महिला, नेर तालुक्यातील वळफळी येथील एक पुरुष, घारफळ येथील एक महिला, नेर शहरातील दोन महिला, यवतमाळ शहरातील शारदा चौक येथील पुरुष, दलित सोसायटी, पाटीपूरा येथील एक महिला, संजीवनी हॉस्पीटलच्या वसतीगृहातील दोन महिला, मोठे वडगाव शांती नगर येथील दोन पुरुष, यवतमाळ शहरातील पिंपळगाव येथील एक महिला, नेताजी नगर येथील एक पुरुष, रोहिनी सोसायटी येथील एक पुरुष, घाटंजी शहरातील एक पुरुष, महागाव तालुक्यातील बेलदरी येथील एक पुरुष, महागाव शहरातील तीन पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील पाच पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील बालाजी पार्क येथील एक पुरुष व एक महिला, शिवाजी वॉर्ड येथील एक पुरुष, सुरज पार्क येथील एक पुरुष, अग्रवाल ले-आऊट येथील दोन पुरुष व एक महिला, व्यंकटेश नगर येथील एक पुरुष व एक महिला, हनुमान वॉर्ड येथील एक पुरुष, पुसद तालुक्यातील घाटोडी येथील एक पुरुष, शेंबाळपिंपरी येथील एक पुरुष, इसापूर येथील एक पुरुष व एक महिला, उमरखेड शहरातील दोन पुरुष व दोन महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष, दारव्हा येथील एक महिला, दारव्हा शहरातील जैन मंदीर रोड येथील एक पुरुष, डोलारी देवी येथील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील हतगाव येथील एक महिला, संगलवाडी येथील एक पुरुष, झरीजामणी शहरातील एक पुरुष, आंध्रप्रदेशातील आदिलाबाद येथील एक महिला, मानोरा ग्रामीण गाव्हा येथील एक पुरुष, दिग्रस शहरातील आरएनएक्स कॉम्प्लेक्स येथील एक पुरुष, अग्रवाल कॉम्प्लेक्स येथील एक पुरुष, कच्ची चौक येथील एक महिला, ताजनगर येथील एक पुरुष व एक महिला, पोलिस वसाहत येथील दोन पुरुष, शास्त्री नगर येथील एक पुरुष, भाटीपूरा येथील एक महिला, गजानन मेडीकल येथील एक पुरुष पॉझिटीव्ह आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ३०६५२ नमुने पाठविले आहे. यापैकी २९७३१ प्राप्त तर ९२१ अप्राप्त आहेत. तसेच २७७७३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या ३१ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६२६ आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १९५८ झाली आहे. यापैकी १२८१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ५१ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १३४ जण भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response