Breaking

Post Top Ad

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

"कोरोना चाचणी वाढवा";आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील

"कोरोना चाचणी वाढवा";आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील
चंद्रपूर,दि.15 ऑगस्ट: जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार आवाक्यात आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा उत्तम असून जास्तीत जास्त चाचणी करावी अशा सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आरोग्य विभागाला दिलेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आरोग्य विभागाचा कोरोना संदर्भातील आढावा घेतांना ते बोलत होते.

कोरोना काळातील परिस्थिती लक्षात घेता समुदाय लागन होता कामा नये, याकडे विशेष लक्ष देण्याची गरच असल्याचे  सांगितले. मोठ्या प्रमाणात शहरी, ग्रामीण भागात सर्वेक्षण करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावी. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

कोरोना संदर्भातील आढावा वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे दिनांक 15 ऑगस्टला ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतला. कोरोनाची जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सादर केली. ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बोलतांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात प्लाझमा डोनर कशा पद्धतीने तयार होतील यासाठी नियोजन करावे अशा त्यांनी सूचना दिल्यात.

कोरोनाच्या काळात विशेष खबरदारी घेऊन बांधकामासाठी येणाऱ्या कामगारांना योग्य ती सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, स्थानिक कामगारांचा सहभाग वाढवावा अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्यात. नियोजित वेळेत महाविद्यालय चंद्रपूरकरांच्या सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.
कोरोना संसर्ग काळात दुर्धर आजार असणाऱ्या नागरिकांकडे विशेषरित्या लक्ष देण्याची गरज आहे.दुर्धर आजार असलेल्या नागरिकांचे सर्व्हेशन करून मोठ्या प्रमाणात ॲन्टीजेन चाचणी करावी. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात औषधे मिळतील असे त्यांनी कोरोना विषयक आढावा बैठकीत सांगितले. यावेळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ.भास्कर सोनारकर तसेच  वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

तत्पूर्वी, निर्माणाधीन नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. विविध आरोग्य सुविधा कशा प्रकारची असणार आहे. महाविद्यालयाचे बांधकाम, बांधकामासाठी लागणाऱ्या मजुरांची व्यवस्था, पुढील काळात कशा पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालय नागरिकांच्या सेवेत असणार याविषयीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. नवीन होणाऱ्या महाविद्यालय बांधकामाविषयीच्या माहितीचे सादरीकरण प्रकल्प प्रमुख बिनोद कुमार यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ.एस.एस मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, प्रकल्प व्यवस्थापक अमसीद खोत, नियोजन व्यवस्थापक मनिष राठी, बाबासाहेब वासाडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad