Post Top Ad
रविवार, ९ ऑगस्ट, २०२०
मायलेकाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या
सध्या कोरोना महामारीत कोण मरेल कोण नाही, हे काळाच्या पोटात दडल आहे. परंतू सात्यत्याने यवतमाळ जिल्हात दिवसं-दिवस शेतकरी आत्महत्या नंतर आता महिला सह मुलांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशात रविवारी दुपारी दरम्यान यवतमाळ जिल्हातील मारेगांव तालुक्यातील म्हसदोडक या गावात माय लेकांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
म्हैसदोडका या गावातील विवाहित महिला आणि दोन वर्षांच्या मुला सोबत महिलेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. माय लेकरांनी जीव देण्याइतके कोणते आभाळ एवढे संकट त्या महिलेवर पडले होते, हे पोलिंसांच्या तपासात पुढे येईलच. दुधाचे ओठ सुकन्या पुर्वीच जन्मस्त्रीने आपल्या दोन वर्षाच्या पोटगोळ्याला प्रथम विहिरीत ढकलून स्वतःही उडी घेत आत्महत्या केली. मोनाली लक्ष्मण पारखी वय 26 वर्षे मुलगा जयेश लक्ष्मण पारखी तीन वर्ष असे मृतकांची नावे आहे.
मारेगांव तालुका मायलेकीचा आत्महत्याने ढवळून निघाला असून नेमका त्या माऊलीने जिवनयात्रा का संपवली? कोणी केलंय त्याला आत्महत्या प्रवृत्त या सर्व बाबीचा तपास पोलिसांनी केल्या नंतर पुढे येणारच आहे. मात्र या दुःखद घटनेनी सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags
महाराष्ट्र#
Share This
About TeamM24
महाराष्ट्र
लेबल:
महाराष्ट्र
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response